Haryana dancer sapna Choudhary can surrender in lucknow court  Google
मनोरंजन

अखेर डान्सिंग क्वीन सपना चौधरी कोर्टाला शरण, फसवणूक चांगलीच भोवली...

सपना चौधरीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. कोर्टानं सपना विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

प्रणाली मोरे

Haryana dancer sapna Choudhary: हरयाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. सध्या सपना चौधरीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. कोर्टानं सपना विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. याप्रकरणात आता सपना स्वतः कोर्टात दाखल होणार आहे.(Haryana dancer sapna Choudhary can surrender in lucknow court)

हाती आलेल्या नवीन वृत्तानुसार,फसवणूकीच्या प्रकरणात सपना चौधरी कोर्टात स्वतःला सरेंडर करणार आहे. यासाठी तिनं तडक लखनौ गाठलं आहे. सपनाविरोधात कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं,ज्यानंतर तिच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे. पण आता सपना स्वतःला सरेंडर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. लखनौच्या आशियाना पोलिस ठाण्यात सपना चौधरीसोबतच अन्य सात जणांविरोधात फसवणूक केल्या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली होती.

हे प्रकरण २०१८ सालातली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, १३ ऑक्टोबर,२०१८ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत स्मृती उपवन इथे सपना चौधरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी प्रती ३०० रुपयानं तिकीटविक्री करण्यात आली होती. हा कार्यक्रम पाहण्यासाठी ३०० रुपयाचं तिकीट घेऊन हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते. पण सपना चौधरी रात्री १० पर्यंत कार्यक्रम स्थळी पोहोचलीच नाही. यामुळे प्रेक्षकांनी खूप हंगामा केला होता. त्यानंतर तिकीटाचे पैसे देखील लोकांना परत दिले गेले नव्हते. आता या प्रकरणासंदर्भातच पुढील चौकशीसाठी सपना चौधरी कोर्टात हजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT