Sapna Choudhary(Haryanvi Dancer) Google
मनोरंजन

हरयाणवी डान्सर सपना चौधरीचा इस्पितळातील व्हिडीओ व्हायरल; चाहते हळहळले

शो दरम्यान सपना चौधरीची तब्येत अचानक बिघडल्यानं तिला इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.

प्रणाली मोरे

हरियाणवी डान्सर(Haryanvi dancer) सपना चौधरी(Sapna Choudhary)ला अख्ख्या भारतात कोण ओळखत नसेल असं होणार नाही. अभिनय,नृत्य यात तर तिनं आपला जलवा दाखवलेला आपण सगळ्यांनी चांगलाच पाहिला,अनुभवला असेल. सपना चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडिया(Social Media)वर शेअर करीत असते. अर्थात तिच्या दिलखेचक अदा फोटोत पाहून तिचे चाहते घायाळ होतातच पण आता मात्र तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर सपनाविषयी काळजी पहायला मिळतेय. सपनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे तिचे चाहते हैराण झालेयत. या व्हिडीओत सपना इस्पितळात दाखल झालेली दिसत आहे. पण काय घडलं आहे नेमकं तिच्यासोबत?

सपना चौधरीची तब्येत तिच्या कार्यक्रमा दरम्यानं अचानक बिघडली होती. ही गोष्ट अगदी अलिकडचीच आहे. त्यानंतर लगेचच सपनाला इस्पितळात दाखल केलं गेलं. पण या बातमीमुळे सपनाचे चाहते मात्र काळजीत पडले होते. पण आता सपनानं इस्पितळातील एक व्हिडीओ शेअर करत,आपण आता ठीक असल्याचा संदेश चाहत्यांसाठी पाठवला आहे. तसंच,तिनं चाहत्यांनी तिच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दलही आभार मानले आहेत.

या व्हिडीओत आपण पाहू शकाल की,सपना इस्पितळात रुग्ण घालतात तो ड्रेस घालून कोणाच्या तरी आधारानं चालत आहे. आजारामुळे कमजोर झालेल्या सपनाला आधार घेत चालायची वेळ आली आहे म्हणून तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. सपनाच्या या व्हिडीओला काही तासातच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT