Hema Malini And Arvind Trivedi esakal
मनोरंजन

Ramayan: हेमा मालिनीनं रावणाला 20 वेळा दिली कानफटात ठेवून, काय होता किस्सा?

प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषचा टीझर व्हायरल झाला अन् सोशल मीडियावर तीव्र शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

Hema Malini fight between Arvind Trivedi: प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषचा टीझर व्हायरल झाला अन् सोशल मीडियावर तीव्र शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्यावरुन आपली नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटले आहेत. भाजपनं तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. तर हिंदू महासभेनं रामायणातील व्यक्तिरेखांना चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचे म्हटले आहे. त्यावरुन वातावरण तापले असताना रामायण - महाभारत मालिकेच्या जुन्या आठवणी आणि किस्से पुन्हा सोशल मीडियावर शेयर होताना दिसत आहे.

दुरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिकांची लोकप्रियता मोठी होती. कोरोनाच्या काळात या मालिकांचे पुन:प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यालाही मोछा प्रतिसाद मिळाला होता. 90 च्या दशकांत या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. सध्या सोशल मीडियावर रामायण या मालिकेतील एक किस्सा व्हायरल झाला आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेद यांच्यातील भांडणाचा तो किस्सा अनेकदा सांगितला गेला आहे. यानिमित्तानं तो पुन्हा व्हायरल झाला आहे.

अरविंद त्रिवेदी हे केवळ टीव्ही मालिकांसाठी नाही तर त्यांच्या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखले जायचे. एकदा तर हेमा मालिनी यांनी त्रिवेदा यांना वीसवेळा कानशीलात लगावली होती. 70 च्या दशकांत हेमा मालिनी आणि अरविंद त्रिवेदी हे हम तेरे आशिक है या चित्रपटामध्ये एकत्र आले होते. त्यावेळी एका दृश्यामध्ये हेमाजींनी त्रिवेदांना कानशीलात मारण्याचा प्रसंग होता. पहिल्यांदा त्यांना हा सीन करताना बऱ्याच अडचणी आल्या. दिग्दर्शकाच्या मनासारखा ही सीन होत नव्हता.

हेमाजींनी बऱ्याचवेळा रिटेक घेतले. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, हेमाजींना तो सीन पूर्ण करण्यासाठी वीस वेळा रिटेक द्यावा लागला होता. मात्र अरविंद त्रिवेदी यांचा चेहरा रागानं लाल झाला होता. पहिल्यांदा हेमाजी तो सीन करायला तयार नव्हत्या. त्यावेळी त्या मोठ्या सुपरस्टार होत्या. बऱ्याच विनंत्या केल्यावर त्यांनी तो सीन करण्यासाठी तयारी दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Army Dog Tyson Story : तीन दहशतवादी केले ठार! आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी; गोळी लागली तरी खचला नाही, पुढे जे झालं...

भारतीयांनो तातडीने इराण सोडा! अमेरिकेसोबतच्या संघर्षानंतर तेहरान दुतावासाचे निर्देश; कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता?

IND vs SA: कधीकधी अतिशहाणपणा नडतो...! अजिंक्य रहाणे प्रचंड संतापला; भारतीय संघाच्या पराभवावर म्हणाला, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला...

ऐश्वर्याला मुलगी झाल्यावर सलमान खानची 'ही' होती प्रतिक्रिया, म्हणालेला...'मी मामा झालो..'

SCROLL FOR NEXT