Hema Malini On Dharmendra And Shabana Azmi Kissing esakal
मनोरंजन

Hema Malini : 'संधी मिळाली तर मी पण लिपलॉक सीन देणार! धर्मेंद्र करु शकतात तर मग....', हेमा मालिनी बोलून गेल्या

शबाना आझमी यांना जेव्हा या सीनविषयी विचारले तेव्हा त्यांनी मला याविषयी काहीही कल्पना नव्हती.

युगंधर ताजणे

Hema Malini On Dharmendra And Shabana Azmi Kissing : ज्यांनी करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट पाहिला असेल त्यांना नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. त्यात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीननं नेटकऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. चाहत्यांना तर या सीननं मोठा धक्काच बसला होता.

शबाना आझमी यांना जेव्हा या सीनविषयी विचारले तेव्हा त्यांनी मला याविषयी काहीही कल्पना नव्हती. दिग्दर्शकानं कथेतील बदल आणि नवा प्रयोग असे म्हणून सुचवले. धर्मेंद्र यांच्यासोबत हा सीन करावा लागला. चित्रपटाची गरज म्हणून कलाकारांना असे सीन करावे लागतात. असे शबाना आझमी यांनी म्हटले होते. यासगळ्यात बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी ७० ते ९० च्या दशकांत बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. हेमा मालिनी यांनी कधीही कोणत्याही चित्रपटातून बोल्ड सीन दिल्याचे ऐकीवात नाही किंवा तसे कधी दिसूनही आले नाही. मात्र सध्या हेमा मालिनी यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. धर्मेंद्र यांच्या त्या किसिंग सीन वर त्यांची ही प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानीमधील तो सीन सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला होता. त्यावरुन वादही झाला होता. मात्र दोन्ही सेलिब्रेटींनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांना आवडल्या. यासगळ्यात हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जागरणमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार हेमा मालिनी यांनी बोल्डपणे आपली भूमिका मांडली आहे.

हेमाजी म्हणाल्या की, मी देखील धर्मेंद्र यांच्याप्रमाणे ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्यास तयार आहे. त्या मुलाखतीमध्ये हेमाजींनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मला ऑनस्क्रीन किस करण्यास कुठलीही अडचण नाही. जेव्हा त्यांना तुम्हाला धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याप्रमाणे ऑनस्क्रिन किसिंग सीन देण्यास काही प्रॉब्लेम आहे का, असे विचारण्यात आल्यावर त्यांनी बेधडकपणे उत्तर दिले आहे.

हेमाजी म्हणाल्या, मी का नाही असे सीन करायचे. मी ते सीन देणार. जर त्या कथेची गरज असेल, आणि ते तितके संयुक्तिक असेल तर मी कदाचित तसे सीन देईल. अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उल्हासनगरहून विजय मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT