Hema Malini reacts to Dharmendra and Shabana Azmi's kissing scene in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani viral  Esakal
मनोरंजन

Hema Malini on Dharmendra: धर्मेंद्र अन् शबाना यांच्या किसिंग सीनवर आता हेमा मालिनी म्हणाल्या, ...

Vaishali Patil

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची हिट जोडी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. मात्र या चित्रपटात रॉकी अन् राणीच्या लव्हस्टोरी शिवाय शबाना आणि धर्मेंद्र यांच्या जोडीची जास्त चर्चा रंगली. त्यांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली.

आलिया अन् रणवीरशिवाय या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात आलिया अन् रणवीर यांच्यातही चित्रपटात अनेक इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. मात्र पुर्ण चित्रपटात गाजला तो एक सीन आहे ज्यामध्ये धर्मेंद्र आणि शबाना यांनी लिप किस केला आहे.

या सीनची सोशल मिडियावर इतकी चर्चा रंगली की त्यावर शबाना आणि धर्मेंद्र यांना देखील प्रतिक्रिया दाव्या लागल्या होत्या. त्यानंतर शबाना यांनी हा सीन पाहिल्यानंतर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया काय होती हे देखील सांगितलं होतं. आता धर्मेंद्र यांच्या पत्नी म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मिडियासोबत बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितले की, 'धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसींग सीन त्यांनी अजून पाहिलेले नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. त्यामुळे धरमजींही खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणे आवडतं.'

याआधी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या प्रमोशनवेळी धर्मेंद्र म्हणाले होते की, हा त्याच्यासाठी उजव्या हाताचा खेळ होता. तर शबाना आझमी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती.

त्या म्हणाल्या की, त्यांना कधी वाटलं नव्हतं की लिप किस सीनची इतकी चर्चा होईल. तो सीन लोक हसायला लावतो आणि सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक जल्लोष करू लागतात. इतकच नाही तर 'धर्मेंद्रसारख्या हँडसमला किस करायला कोणाला आवडणार नाही.' असं बोल्ड वक्तव्यही त्यांनी दिलं होतं. ज्याची चर्चाही सोशल मिडियावर खुप रंगली.

रॉकी और रानी की प्रेमकहानी चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर आता पर्यंत या चित्रपटाने 70 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा निर्मात्यांना आणि चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 254 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Rasha Thadani: रवीना टंडनची कन्या राशा आता तेलुगू चित्रपटात

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिना संपायला ६ दिवस बाकी... लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होणार?

Latest Marathi News Updates : कल्याण - शीळ रोडवर मोठा दिशा दर्शक फलक अचानक कोसळला...

Pune News : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल चारपट वाढले; चालकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT