Hema Malini shares her bad experience with traffic, pity road in mumbai
Hema Malini shares her bad experience with traffic, pity road in mumbai  sakal
मनोरंजन

मुंबईतील रस्ते गर्भवती महिलांसाठी.. हेमा मालिनी यांची पालिकेवर सडकून टीका

नीलेश अडसूळ

hema malini : पावसाळा आला आणि मुंबईच्या खड्ड्यांचा आणि पाणी तुंबण्याचा विषय आला नाही असं अशक्यच. कित्येक वर्षे मुंबईतील हे प्रश्न कायमच आहे. दरवर्षी मुंबई महानगर पालिका यावर स्पष्टीकरण देते, काम केल्याचे तपशील ते पण समस्येवर तोडगा काही निघत नाही. खड्ड्यांवरून दरवर्षी मोठे राजकारण होते. विरोधक पालिकेवर जोरदार टीका करतात. पावसाळा सुरू होऊन चार दिवस झाले नाही तोवरच मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. या समस्येवर आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रकाश टाकला असून, मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था बोलून दाखवली आहे. (hema malini on mumbai road)

(Hema Malini shares her bad experience with traffic, pity road in mumbai)

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबईच्या रस्त्यांची अवस्था पाहून संताप व्यक्त केला आहे. चित्रीकरणा दरम्यान मुबंईमध्ये प्रवास करणं किती अवघड झालं आहे याबाबत त्या बोलल्या आहेत. 'मुंबईच्या रस्त्यांची बिकट अवस्था पाहून एखादी गर्भवती महिला या रस्त्यांवरुन प्रवास कसा करत असावी याचा विचारही करवत नाही. मी तर मुंबईत प्रवास करताना अक्षरशः घाबरते. रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी आणि यादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती तर त्यापेक्षाही वाईट आहे. दिल्ली-मथुरामध्ये देखील बरीच वाहतूक कोंडी व्हायची. पण आता तिथली परिस्थिती सुधारली आहे.'असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, 'चित्रीकरणाच्या निमित्ताने मी मुंबईमध्ये प्रवास करत असते. पण आता हा प्रवास करणंच कठीण होऊन बसलं आहे. मुंबई काय होती आणि आता काय झाली आहे.' त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हेमा मालिनी या अभिनेत्री आहेच शिवाय त्यांचे राजकीय विश्वाशीही जवळचे नाते आहे. त्या भारतीय जनता पक्षात असून त्या लोकसभेत खासदार आहेत. त्यामुळे समाजातील अनेक खटकणाऱ्या गोष्टींवर त्या भाष्य करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT