Hemangi kavi: Esakal
मनोरंजन

Hemangi kavi: हेमांगी येतेय! नवी सिरिज अन् नव्या OTT चॅनलसोबत...येताय ना मग ‘Blind Date’वर

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील हेमांगी कवी ही आघाडीची अभिनेत्री आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

हेमांगीही सोशल मीडियाच्या माध्यामातुन वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं रोखठोकपणे आणि बिनधास्तपणे सोशल मिडियावर मांडत असते. काल हेमांगीला मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान पायाला मोठी दुखापत झाली. पण ही दुखापत होऊनही तीने चित्रीकरण थांबवले नाही. त्यामुळे तिच कौतुकही झालं.

त्यातच आज हेमांगीने आणखी एक नवीन पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तिने चाहत्यासोबत एक गोड बातमी शेयर केली आहे. नुकतिच मालिका विश्वात सक्रिय झालेली हेमांगी आता ओटीटीवरही प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

ती आणखी एका सुंदर प्रोजेक्टच्या माध्यामातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तेही एका नव्या ओटीटी चॅनेलच्या माध्यमातुन... ज्याचा प्रोमो तिने तिच्या सोशल मिडियावर शेयर केला आहे. थोड्याच वेळात हा प्रोमो व्हायरल झाला. या सिरिजच नाव आहे 'ब्लाईंड डेट'

तिच्या या प्रोजेक्ट बद्दल सांगतांना तिने लिहिले की, आणखी एक सुंदर project एका नव्या कोऱ्या ott channel

‘1 Ott’ वर प्रदर्शित झालंय.

‘Blind Date’ नावाची १० भागांची ही series आहे. प्रत्येक भागात नविन जोडी सह नविन गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट कुठल्याही भागापासून पाहायला सुरू करू शकता. माझ्या गोष्टीचा क्रमांक आहे नववा! Episode no 9.

आता Blind Date या नावाप्रमाणे Romantic वगैरे तर आहेच पण त्यासोबत जरा हसवणारं, थोडं आत्म परिक्षण करायला लावणारं, कधी डोळ्याच्या कडा पाणवणारं तर कधी जुनं काही आठवून त्यात रममाण करणारं. सर्वात गंमतीदार भाग म्हणजे यातल्या जोड्या. काही जोड्या खुपच off आहेत. म्हणजे ज्यांचा आपण एक pair म्हणून दूरदूरपर्यंत विचार करू शकत नाही अशा. आता आमचीच जोडी घ्या!

माझी आणि Abhijeet Khandkekar ची जोडी. मी कधी विचारच केला नव्हता की आम्हांला pair म्हणून कधी कुणी cast करेल.

अजून बऱ्याच अशा जोड्या आहेत ज्यांना पाहून तुम्हांला नक्कीच मौज येईल.

खूप दिवसांनी अशी भूमिका जी दिसायला Modern आहे, Glamorous आहे, Bold आहे माझ्या वाट्याला आलीए. त्यासाठी या series च्या Makers ची मी आभारी आहे. कलाकार नेहमी वेगवेगळ्या भूमिका करायची संधी शोधत असतो. ही संधी मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

हे 1OTT App चक्क FREE आहे. तेव्हा पटकन download करून घ्या. तुमच्या Mobile मधली थोडीशी जागा जाईल पण तुमच्या मनात ही ‘Blind Date’ घर करेल हे नक्की!'

या पोस्टसोबत हेमांगीने सिरिजची झलकही शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT