Hemangi Kavi dance on bhojpuri song laika laika me hola ladhai share video reel viral viral  sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: लइका मे होला लढाई.. या भोजपुरी गाण्यावर थीरकली हेमांगी कवी.. video व्हायरल..

हेमांगीचा नवा व्हिडिओ होतोय व्हायरल..

नीलेश अडसूळ

Hemangi kavi viral video: हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते.

ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सतत काहीना काही पोस्ट करत असते, रील टाकत असते. आज मात्र तिने एक भन्नाट व्हिडिओ शेयर केला आहे. यावेळी ती चक्क भोजपुरी गाण्यावर थीरकली आहे.

(Hemangi Kavi dance on bhojpuri song laika laika me hola ladhai share video reel viral )

हेमांगीनं नुकताच एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये हेमांगी आपल्या घरातच बसून डान्स करते आहे. तिने हे रील शूट करून शेयर केले आहे. ज्यामध्ये ती चक्क भोजपुरी गाण्यावर थिकरली आहे. '' जाओ कालेजव में का करेलु पढाई.. टी का करी.. लाइक लाइका में होला लड़ाई.. होला लड़ाई.. होला लड़ाई..'' असे या गाण्याचे शब्द आहेत.

हेमांगीने अगदी भावपूर्ण अभिनय करत ही रील शूट केली आहे. तिचे हावभाव अत्यंत मजेशीर आणि गाण्याला साजेसे वाटतात. त्यामुळे गाणं आपल्याला कळत नसलं, त्याचा अर्थ कळत नसला तरी हेमांगीचा व्हिडिओ मात्र आपल्याला सहज आवडून जातो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हेमांगीने या व्हिडिओला कॅप्शनही तसेच भन्नाट दिले आहे. ''देसी बैकस्ट्रीट बॅाईज कान्सर्ट! '' असं ती म्हणाली आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी फुल्ल फिदा झाले असून काही मिनीटातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच्यावर अनेकांनी कमेंट करत हेमांगीच्या अभिनयाचं कौतुक देखील केलं आहे. एकानं तर 'मी हा व्हिडिओ सारखा सारखा पाहतोय पण मन भरत नाहीय.. इतका भारी केला आहेस' असं म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT