hemangi kavi emotional post for veteran actor ravindra berde movie dhudgus SAKAL
मनोरंजन

Ravindra Berde: "इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना..." हेमांगीची रविंद्र बेर्डेंसाठी भावूक आठवण

हेमांगीने तिच्या धुडगुस सिनेमातली एक भावुक आठवण सांगितली आहे

Devendra Jadhav

Hemangi Kavi on Ravindra Berde: काल १३ डिसेंबरला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंचा सख्खा भाऊ ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डेंचं निधन झालं. रविंद्र यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातला एक दिग्गज कलाकार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने रविंद्र बेर्डेंविषयी भावूक आठवण पोस्ट केलीय. हेमांगीने रविंद्र यांच्यासोबत 'धुडगुस' या मराठी सिनेमात अभिनय केला होता. त्याविषयीची भावुक आठवण हेमांगीने सांगितली आहे.

हेमांगीने धुडगुस सिनेमातला एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हेमांगी लिहीते, "रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे."

हेमांगी पुढे लिहीते, "यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सग्गळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं!
ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी!"

रविंद्र बेर्डे यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण पुढे उपचार घेऊन घरी आल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT