hemangi kavi posted a funny video abut makeup artist and Cannes  sakal
मनोरंजन

'कान्सला जाण्याची तयारी करतेय..' हेमांगी कवीचा कहर व्हिडीओ..

'जेव्हा चांगले मेकअप आर्टिस्ट परवडत नाहीत' असं म्हणत अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नीलेश अडसूळ

Hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. शिवाय समाज माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. कधी मनमुराद नाच करते तर कधी गमतीशीर व्हिडीओ करते. असाच एक धमाल व्हिडीओ तिने नुकताच पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ न चुकवण्यासारखा आणि लोटपोट हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये हेमांगीने 'जेव्हा चांगला मेकअप आर्टिस्ट परवडत नाही..' अशी टॅगलाईन दिली आहे. सोबतच हातात आरसा आणि काजळ घेऊन ती उभी आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने तिने हे काजळ रेखाटले आहे. शिवाय ती आपल्या हावभावाने हे किती विद्रुप असल्याचेही दाखवून देते. (hemangi kavi posted a funny video abut makeup artist and give taunt to Cannes)

या व्हिडीओला तिने 'कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जाण्यासाठी मी तयारी करीत आहे' असे विचित्र कॅप्शन दिले आहे. आता प्रश्न पडतो हेमांगीने या विचित्र रूपाचा कान्स फेस्टिवलशी (cannes 2022) का बरं संबंध जोडला असेल. तर त्याचे कारण ही खास आहे. या व्हिडीओ मध्ये हेमांगीने एका हॉलीवूड अभिनेत्रीचाही व्हिडीओ जोडला आहे. ज्यामध्ये तिने या फेस्टिवलला असा लुक केला होता. शिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone in cannes 2022) हिनेही असा विचित्र मेकअप केल्याने तिला ट्रॉल केले गेले. त्यामुळे असे बरेच संदर्भ घेऊन हेमांगीने हा व्हिडीओ केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT