'माझी आई माझ्यापेक्षा बोल्ड'.. प्राजक्ता माळी काय म्हणाली ऐकाच..

आलिया भट्ट कामाठीपुऱ्यातील गंगुबाई साकारू शकते तर तू का नाही? आईनेच दिला प्राजक्ताला पाठींबा
prajakata mali mother's reaction on ranbazar marathi web series
prajakata mali mother's reaction on ranbazar marathi web series sakal

Prajakta mali : मनोरंजन विश्वात वेब सिरीज या माध्यमाने अनेक बदल घडवून आणले. हे बदल केवळ हिंदीत नाही तर मराठीतही झाले. अनेक दमदार मराठी वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्या. एवढेच नव्हे तर प्लॅनेट मराठी (planet marathi) च्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वाला एक स्वतंत्र ओटीटी वाहिनी मिळाली. नुकतंच त्यांनी 'रानबाजार' (raanbaazaar) या त्यांच्या नव्या वेब सिरीजची घोषणा केली आणि टिझर प्रदर्शित केला. या टिझरमध्ये प्राजक्ता माळी (prajakta mali) आणि तेजस्विनी पंडितचे (tejaswini pandit) बोल्ड रूप पाहून त्यांना खूप ट्रॉल केले गेले. यावर अखेर प्राजक्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

prajakata mali mother's reaction on ranbazar marathi web series
ज्युनिअर एनटीआरच्या 'NTR 30' या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून डोळे फिरतील

या वेब सिरीज मध्ये प्राजक्ता माळीने एका वेश्याची भूमिका साकारली आहे. टिझरमध्ये तिचा प्रणय प्रसंगातील सिन समोर आला. अत्यंत बोल्ड अशा या सिनमुळे चाहते नाराज झाले. (prajakta mali bold scene in ranbazar) प्राजक्ता वर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. नुकत्याच झालेल्या 'सकाळ' च्या मुलाखतीत प्राजक्ताने यावर सडेतोड भाष्य केले आहे. ती म्हणाली, 'मी जेव्हा ही सीरिज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रेक्षकांकडून अशा प्रतिक्रिया मला मिळणार हे अपेक्षित होतं. कारण आतापर्यंत मी ज्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया स्वाभाविकच आहे.' (prajakta mali reaction on ranbazar)

prajakata mali mother's reaction on ranbazar marathi web series
रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन

पुढे ती म्हणाली, 'मी पहिल्यांदा जेव्हा सीरिजचं कथानक ऐकलं तेव्हा प्रचंड उत्साहित झाले होते. काही नवीन, आव्हानात्मक करण्याची संधी मला मिळत होती. त्यामुळे यातील कोणतीही भूमिका करण्याची माझी तयारी असल्याचं मी तेव्हाच जाहीर केलं होतं. माझी भूमिका ही कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्करची असल्याचं प्रेक्षकांना ट्रेलर मधून समजलं आणि टीका होऊ लागली. पण मी जे काम केलं आहे ते सीरिजच्या कथनकाला पूरक असं आहे. त्या कथानकाची ती गरज आहे हे प्रेक्षकांना सीरिज पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल.'

या भूमिकेबाबत तुझ्या आईची भूमिका काय होती असे प्राजक्ताला या मुलाखतीत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, 'माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. मी तिची परवानगी घेऊनच हे काम केलं आहे. माझी आई पुढारलेल्या विचारांची आहे. त्यामुळे कलाकार प्राजक्ता आणि माणूस म्हणून प्राजक्ता कशी आहे, याची तिला व्यवस्थित माहिती आहे. कलाकार प्राजक्ताला तिनं कायमच पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही जेव्हा मी तिला सीरिजचं कथानक आणि त्यातील माझी भूमिका सांगितली. त्यावर ती म्हणाली जर आलिया भट्ट कामाठीपुऱ्यातील गंगुबाई साकारू शकते तर तू का नाही?' अशा शब्दांत तिनं माझ्या 'रानबाजार' मधील भूमिकेला पाठिंबा दिल्याचे प्राजक्ताने सांगितले. (prajakta mali mother's reaction on ranbazar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com