hemangi kavi  sakal
मनोरंजन

लागली का गोळी.. म्हणत हेमांगी करतेय घायाळ 

अभिनेत्री हेमांगी कवी हिने एका व्हिडिओच्या माध्यामातून नजरअदा करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. यावेळी ठेका धरताना तिने चाहत्यांना नजरेची गोळी मारली आहे.

नीलेश अडसूळ

Entertainment News :हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. सध्या तिच्यातली लावण्यवती बाहेर आली असून एक धमाल व्हिडीओ तिने तयार केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. यंदा तिचा खास अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोआहे. कारण चक्क लावण्यवतीचे रुप धारण करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. पण यंदा नजरेचा बाण नाही तर थेट गोळीच तिने चाहत्यांच्या काळजात मारली आहे. अभिनयापलीकडे अनेक सामाजिक विषयांवर, स्त्रियांच्या प्रश्नांवर बेधडक मत मांडत असल्याने हेमांगी चर्चेत असते.

हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऍक्टिव्ह असण्याबरोबरच ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करत असते.अलीकडे तीने असाच एक व्हिडीओ तीच्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट केला आहे. या व्हिडिओत डोळ्यांनी इशारे करत जणू ती बंदूकीचा निशाणा साधतेय.  'पोचला का बाण तसं लागली का गोळी! अखियो से गोली मारे!!!' असे  कॅप्शन  देत तीने हा व्हिडीओला दिले आहे. 

साडी नेसून मराठमोळ्या लूक मध्ये तिने ही अदाकारी केली आहे. या व्हिडिओला तिने गाण्याऐवजी बंदुकीचा आवाज दिला आहे. शिवाय हॅशटॅग नथीचा नखरा,ट्रॅडिशनल अशी काही टॅग्स लावत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तर एकाने 'मरता मरता वाचलो' अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT