hemangi kavi share experience of ganpati darshan at cm shinde varsha bunglow  SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: "लाज वाटली आणि वाईटही वाटलं", हेमांगी कवीने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंच्या गणपती दर्शनाचा अनुभव

हेमांगी कवी आणि सर्व मराठी कलाकार मुख्यमंत्र्यांंच्या घरी वर्षावर गणपती दर्शनाला गेले होते.

Devendra Jadhav

हेमांगी कवी आणि इतर मराठी कलाकार काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

हेमांगी कवीने सोशल मिडीयावर मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनाचा अनुभव शेअर केलाय. हेमांगीने मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करुन हेमांगी लिहीते.

(hemangi kavi share experience of ganpati darshan at cm shinde varsha bunglow)

हेमांगी लिहीते, जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील!

हेमांगी पुढे लिहीते, "एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता Security reasons मुळे काही गोष्टी नाही share करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं!"

हेमांगी पुढे लिहीते, "मंगेश देसाई तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली!

खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं."

हेमांगी शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल सांगते, "मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की “गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या late कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना personally भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची, बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर photo हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, protocols सांभाळत लाखो photos साठी उभं राहयचं. उत्साहाच्या भरात मी पण त्यांना photo साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?” तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!”

मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!” खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT