hemangi kavi share experience of working with amitabh bachchan  SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: "मी डायलॉगमध्ये बदल केल्याचं कळताच त्यांनी...", बिग बींसोबतचा अनुभव हेमांगीने सांगितला

हेमांगीने काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूटींग केलं, त्याचा अनुभव तिने सांगितला

Devendra Jadhav

हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. हेमांगीने काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूटींग केलं. हेमांगीने अमिताभ यांच्यासोबतचा शूटींगचा अनुभव शेअर केला.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हेमांगीने तिला आलेला अनुभव सविस्तरपणे मांडला आहे. काय म्हणाली हेमांगी वाचा.

(hemangi kavi share experience of working with amitabh bachchan)

हेमांगीने दिलेल्या मुलाखतीप्रमाणे, तिने याआधी एकूण दोन वेळा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे. पहिल्यांदा जेव्हा तिने काम केलं तेव्हा तिचं आणि बिग बींचं शूटींग वेगवेगळं होतं. त्यामुळे तिला अमिताभ यांना भेटण्याची संधी मिळाली नाही.

यावेळी सुद्धा जेव्हा हेमांगीने जाहीरातीसाठी ऑडिशन दिली तेव्हा तिला कल्पना नव्हती की आपल्याला द ग्रेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचंय. जेव्हा बच्चन साहेब स्वतः शुटींगच्या ठिकाणी आले तेव्हा तिला विश्वास बसत नव्हता.

हेमांगी आणि अमिताभ बच्चन यांनी शूटींगच्या आधी थोडी रिहर्सल केली. तेव्हा हेमांगीने स्क्रीप्टच्या नकळत एक डायलॉग घेतला. तेव्हा बच्चन साहेब तिला म्हणाले, "तुम्ही हा डायलॉग अशा पद्धतीने घेणार आहात का?"

हेमांगीला भिती वाटली. तिला वाटलं तिचं काही चुकलं का. मग जेव्हा प्रत्यक्षात शूटींग सुरु झालं तेव्हा तिने कोणताही बदल न करता स्क्रीप्टनुसार डायलॉग म्हटले. हे पाहून बच्चन साहेबांनी तिला आधीचा बदल चांगला होता असं सुचवलं.

हे ऐकताच हेमांगी खुश झाली. आणि दिग्दर्शकाने हेमांगी आणि बिग बींची ही जाहीरात शूट केली. हेमांगीचा हा अनुभव स्वप्नवत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : कूपर रुग्णालयातील शौचालयात पडून रुग्णाचा मृत्यू: उपचारातील दुर्लक्षाचा गंभीर आरोप

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT