hemangi kavi shared post about her work stress and long night sleep
hemangi kavi shared post about her work stress and long night sleep  sakal
मनोरंजन

हेमांगी कवी तब्बल सोळा तास होती झोपेत.. जाणून घ्या नेमकं काय घडलंय?

नीलेश अडसूळ

Hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. शिवाय समाज माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. कधी मनमुराद नाच करते तर कधी गमतीशीर व्हिडीओ करते. यंदा मात्र तिने कामामुळे आलेल्या तणावाविषयी भाष्य केले आहे. कामाचा ताण आल्यावर काय होऊ शकते याबाबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने झोप किती महत्वाची आहे हे सांगितले आहे.

यासोबत तिने काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हेमंगी प्रचंड दमलेली आणि थकेलेली दिसत आहे. झोपेतून उठल्यावर एखाद्याची अवस्था असावी तशी हेमांगी दिसत आहे. पण तिचा मूड अत्यंत फ्रेश आहे शिवाय तिने केसात फूल माळले आहे. तर एका फोटोमध्ये ताट भरून फुलं खिडकीपाशी ठेवली आहेत. हे फोटो पाहून सकाळ झाल्याचा अंदाज येतो. या फोटोला हेमांगीने मस्त कॅप्शन दिले आहे. (hemangi kavi shared post about her work stress and long night sleep)

हेमांगी म्हणते, 'बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त बरीच धावपळ, प्रवास चालू होता, झोपेचं खोबरं झालं होतं. काल लवकर pack up झाल्यामुळे व्यवस्थित झोपायला मिळालं आणि मी ही घोडे बेचके झोपून गेले.. 16 तास. झोपेचा backlog भरून काढल्यासारखं झालं. आज उठल्यावर इतकं कमाल वाटत होतं. मन, डोकं सगळं थार्यावर असल्यासारखं. Energy revive झाली आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात.' अशी पोस्ट हेमागीने केली आहे. पुढे ती म्हणते, 'आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण झोपच आहे याचा साक्षात्कार झाला!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT