Hemant Dhome and lalit prabhakar shared post about they arrange one pre release show of sunny marathi movie for audience  sakal
मनोरंजन

Sunny: रिलीज होण्याआधीच पहा 'सनी'चित्रपट, ललित प्रभाकर आणि हेमंत ढोमे कडून खास ऑफर..

Hemant Dhome and lalit prabhakar : मराठीत पहिल्यांदाच होतोय असा प्रयोग..

नीलेश अडसूळ

Hemant Dhome and lalit prabhakar: सध्या चर्चा आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटाची. 'झिम्मा'च्या प्रचंड यशानंतर हा चित्रपट येणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटात 'सनी'ची भूमिका ललित प्रभाकर करणार असून चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग असे अनेक दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाबाबत एक नवा प्रयोग लवकरच समोर येत आहे आणि तो खास प्रेक्षकांसाठी असणार आहे. नुकतीच याची घोषणा दिग्दर्शक हेमंत धोमे आणि अभिनेता ललित प्रभाकर यांनी केली आहे.

(Hemant Dhome and lalit prabhakar shared post about they arrange one pre release show of sunny marathi movie for audience )

हेमंत (hemant dhome) आणि ललित (lalit prabhakar) या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या आगामी 'सनी' चित्रपटाबाबत एक मोठे सरप्राइज आहे, अर्थात ही सरप्राइज प्रेक्षकांसाठी आहे. तर ते असे की, आजवर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा एक खास शो लावला जातो. या विशेष स्क्रीनिंग साठी केवळ कलाकार, मान्यवर आणि मित्र परिवाराला बोलावले जाते. पण दिग्दर्शक हेमंत ढोमेने मात्र एक नवी संकल्पना समोर आणली आहे.

त्यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे की, 'सनी'च्या ट्रेलर आणि गाण्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक खास भेट आणली आहे. 'सनी'चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. पण त्यापूर्वीच म्हणजे 14 नोव्हेंबरला आम्ही एक खास शो म्हणजेच प्रीरिलीज शो प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत. असा प्रीमियर शो खरं तर मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी अरेंज केला जातो. पण तो प्रेक्षकांसाठी अरेंज करावा असा निर्णय आम्ही घेतला. मराठीत असं प्रयोग आम्ही पहिल्यांदाच करत आहोत. तेव्हा 14 तारखेला पुण्याच्या पिव्हीआर आयकॉन मध्ये सायंकाळी 7,30 वाजता नक्की भेटा आणि आजच आपली तिकीट बूक करा. या शोला चित्रपटाची संपूर्ण टीम देखील उपस्थित राहणार आहे.' असे आवाहन यांनी चाहत्यांना केले आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. घरापासून दूर राहणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2025

Panchang 18 July 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : तेथे पैजाराचे काम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2025

SCROLL FOR NEXT