Hemant Dhome Instagram
मनोरंजन

Hemant Dhome: 'मराठीत वेगळे प्रयोग होत नाहीत...', 'वाळवी' पाहिल्यावर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी सिनेमाविषयी सध्या भलतीच क्रेझ पहायला मिळत आहे. दरम्यान आता हेमंत ढोमेनं वाळवी संदर्भात केलेल्या पोस्टनं लक्ष वेधलं आहे,

प्रणाली मोरे

Hemant Dhome: हेमंत ढोमे सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा ज्या पोस्ट करतो त्याची जोरदार चर्चा रंगते. हेमंत फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आता नावारुपास आला आहे. नुकताच त्याचा 'सनी' चित्रपट आपल्या भेटीस आला होता. चित्रपटाच्या कथेत दम होता पण तो बॉक्सऑफिसवर फारसा काही चालला नाही.(Hemant Dhome Post For Vaalvi Marathi view)

हेमंत मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून अनेकदा चित्रपटांसाठी आपला आवाज उठवताना दिसतो. कधी मराठी चित्रपटांना शो अधिक मिळावेत म्हणून तो आग्रही दिसतो तर कधी दुसऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा म्हणूनही तो हक्कानं प्रेक्षकांना चित्रपट पहायचं आवाहन करतो.

हेमंत ढोमेनं नुकतीच 'वाळवी' या मराठी चित्रपटा संदर्भात एक लांबलचक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं 'वाळवी' प्रेक्षकांना पाहण्याचं आवाहन तर केलंच पण ते करताना त्याने मराठी प्रेक्षकांची कानउघडणी देखील केल्याचं दिसत आहे.

हेमंत ढोमेनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''एक असतो मराठी सिनेमा आणि दुसरा असतो वाळवी! म्हणजे अतिशय सकस आणि चांगला सिनेमा! मराठीत वेगळे प्रयोग होत नाहीत, सकस पटकथा नसतात… कलाकारांची तद्दन विनोदी तिच तिच कामं असतात… शुटींगचा दर्जा फारच सुमार असतो, साऊंड वगैरे तर बोलायलाच नको नाही का? प्रेक्षकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांना कडक दर्जाचं उत्तर म्हणजे आमचा सिनेमा ‘वाळवी’''

''मी टिमचा भाग नसुनही आमचा म्हणतोय कारण आम्हा सगळ्या कलाकारांना अभिमान वाटावा असा झालाय हा सिनेमा! असे सिनेमे जमून यायला लागते ती एक दर्जेदार टीम! एका कोणाचं नाव घेणं म्हणजे बाकी टिमवर अन्याय आहे… वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम ठोकलंय एवढंच म्हणेन!''

''मी काही समिक्षक नव्हे, मी मराठी सिनेमाचा चोखंदळ प्रेक्षक म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय!वा ळ वी… ब घा च!!! वाळवी तुमचं मनोरंजन करणारच! तुम्हाला मजा येणारच!''

परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमा १३ जानेवारी,२०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात स्वप्निल जोशी,सुबोध भावे,अनिता दाते,शिवानी सुर्वे अशी स्टारकास्ट आहे. सिनेमाचा झिणझिण्या आणणारा ट्रेलर पाहून लोकांना सिनेमाची उत्सुकता होतीच. आता प्रेक्षकांना चित्रपट किती आवडतोय हे बॉक्सऑफिसच्या कमाईवरनं कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari: पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल; १० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दीड वर्षीय चिमुकल्याला ३० सेकंदात ८ वेळा आपटलं, आरोपीला फाशीची शिक्षा; ४० दिवसात निकाल, काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री १० वाजता पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखींचे घेणार दर्शन

Sant Nilobaray Maharaj Palkhi : निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT