hera pheri 3, akshay kumar, sunil shetty, paresh rawal SAKAL
मनोरंजन

Hera Pheri 3: अभी मजा आएगा ना भिडू..! राजू, श्याम, बाबुभैय्याच्या 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला सुरुवात

हेरा फेरी ३ च्या शूटिंगला आजपासून धमाकेदार सुरुवात झालीय.

Devendra Jadhav

Hera Pheri 3: गेल्या अनेक दिवसांपासून हेरा फेरी ३ सिनेमा चर्चेत आहे. राजू, बाबूभैय्या आणि श्याम या त्रिकुटाने अनेक पुढ्यांची निखळ करमणूक केलीय. आता हि तीन अतरंगी माणसं पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

हेरा फेरी ३ च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर हेरा फेरी ३ च्या शूटिंगला आजपासून धमाकेदार सुरुवात झालीय.

( Hera Pheri 3 goes on floors today. This comic caper is eagerly awaited)

हेरा फेरी ३ साठी अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल एकत्र आले आहेत. याआधी अक्षय हेरा फेरी ३ मध्ये काम करणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण आता हेरा फेरी ३ साठी तयार झाला असून त्याने परेश रावल - सुनील शेट्टी सोबत हात मिळवले आहेत.

हेरा फेरी ३ साठी अक्षय - सुनील आणि परेश रावल आज मुंबई एकत्र आलेत. त्यांनी अंधेरीला असणाऱ्या एम्पायर स्टुडिओज मध्ये हेरा फेरी ३ च्या शूटिंगला सुरुवात केलीय.

बाबूभैय्या, राजू आणि श्याम यांचा हेरा फेरी कोणी पाहिला नाही असा माणूस सापडणं कठीण आहे. लहानांपासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सर्वांना हेराफेरी प्रचंड आवडतो. हेरा फेरी आणि हेरा फेरी २ या दोन्ही भागांचे प्रचंड चाहते आहेत.

हेरा फेरीचे कॉमेडी व्हिडिओज, मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आता हेरा फेरी ३ च्या शूटिंगला सुद्धा सुरुवात झाल्याने सर्वांच्या आनंदाला उधाण आलंय.

अक्षयने गेल्या वर्षी सर्वांसमोर जाहीर केले होते की काही क्रिएटिव्ह फरकांमुळे तो हेरा फेरी ३ चा भाग नसणार आहे. पण आता हेरा फेरी ३ ला पोषक वातावरण असल्याने अक्षय कुमार हेरा फेरी ३ साठी तयार झाल्याचं सांगण्यात येतंय.

काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारने मुंबईत सुनील शेट्टी, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांची भेट घेऊन हेरा फेरी ३ विषयी चर्चा केली.

अखेर आज हेरा फेरी ३ सिनेमाला शूटिंग झाली असून पुढच्या वर्षी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

'तिनं' जीवन संपवलं नव्हतंच तर...! घरात कुणी नसताना गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणी दिसली; पण तपासात वेगळंच सत्य समोर, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार

Viral: प्रेम, करार आणि वेळापत्रक! पत्नीनेच पतीसाठी २ गर्लफ्रेंड शोधल्या; झोपणे, उठणे, जेवण सगळ्याची वेळही ठरली नंतर... काय घडलं?

अभिनेत्रीने घेतला 'देवमाणूस' मालिकेचा निरोप; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'एका सुरुवातीचा शेवट...'

SCROLL FOR NEXT