sindhu 
मनोरंजन

संयम आणि संघर्षातून जगण्याची नवी उमेद देणारी 'सिंधू'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- मराठी मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. वैविध्यपूर्ण कथा आणि अनोखी विषय मांडणी असणा-या मालिका प्रेक्षकांना देण्याचं काम ZEE5 करत आहेत. यातलाच एक आगळावेगळा प्रयोग म्हणजे 'सिंधू' ही मालिका. 'सिंधू'चे प्रोमो सुरुवातीपासूनंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. 'सिंधू एका सामान्य मुलीची असामान्य कथा' या मालिकेत १९ व्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा पाहायला मिळत आहे. ही मालिका ZEE5 वर प्रसारित होत आहे.

'सिंधू' या मालिकेत तिचा आयुष्यातील खडतर प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेषतः तिची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड दाखवण्यात आलीये. तिचं बालपण, शिक्षण आणि मग लग्न असा विविध टप्प्यांवरिल तिचा संघर्ष प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. टिपिकल सास-बहू ड्रामाला तडा देत 'सिंधू' ही काल्पनिक मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरत आहे. त्यातच स्वातंत्र्यापूर्वीचं एकोणिसाव्या शतकातील वातावरण, आचार-विचार, केशभूषा, वेशभूषा, वाडे अशा अनेक निराळ्या गोष्टी यात बघायला मिळत आहेत.

'सिंधू' या मालिकेत स्वातंत्र्यापूर्वीचा काळ असल्याने त्यावेळच्या रुढी, परंपरा जोपासताना यात दिसून येतात. मात्र बालविवाह, जातीभेद, विधवा स्त्रियांच्या बाबतील असलेले समाजाचे विचार हे सगळं या मालिकेत आहे. याच सगळ्या चुकीच्या रुढी परंपरांमधून सिंधू स्वतः जाते आणि त्यामुळे ती कशी या समाजातील चुकीच्या समजुतींना बदलण्याचा प्रयत्न करते हे पाहायला मिळेल. 

सिंधूच्या या पात्रातून महिलांना सबलीकरणाचे धडे घेता येतील. त्या काळी शिक्षणाला महत्व देऊन चुकीच्या चालीरितींना विरोध करणारी सिंधू प्रेक्षकांना अनेक गोष्टींचा सकारात्मक विचार करायला भाग पाडते. सिंधूच्या या पात्रातून महिलांना शिकण्यासाख्या अनेक गोष्टी आहेत. केवळ घरकामात अडकून न राहता त्यासोबतंच स्वतःच्या ध्येयाची दिशा आखावी, स्वतः शिक्षण घेऊन इतरांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावं, नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात कराव्यात, स्वतःच्या हक्कांसाठी लढावं, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावं अशा अनेक गोष्टी ज्या सिंधूने त्या काळात केल्या त्या आजच्या स्त्रियांनी देखील अंगीकारुन स्वतःचं सबलीकरण करुन घ्यावं हे यातून शिकायला मिळतं.   सिंधू या मालिकेचे एपिसोड तुम्हाला ZEE5 वर केव्हाही पाहता येतील.

here are reasons why you should not miss sindhu serial

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT