मनोरंजन

विवियनची तुलना नाना पाटेकरांशी; नीना गुप्तांनी आशा भोसलेंना दिलं असं उत्तर

या कार्यक्रमात नीना आणि विवियन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

स्वाती वेमूल

अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta यांनी बॉलिवूडमध्ये काही दमदार भूमिका साकारल्या. अभिनयाच्या कारकिर्दीसोबतच नीना त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिल्या. क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतचं Vivian Richards त्यांचं नातं फारच चर्चेत होतं. या दोघांना मसाबा ही मुलगी आहे. पण विवियनने नीना यांच्याशी लग्न केलं नाही. नीना यांनी एकटीनेच मसाबाचं संगोपन केलं. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'सच कहूँ तो' या आत्मचरित्रात नीना यांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. या आत्मचरित्रात त्यांनी एका बॉलिवूड इव्हेंटमध्ये घडलेला किस्सा सांगितला. विवियन रिचर्डसोबत नीना यांनी बॉलिवूडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Here is how Neena Gupta reacted when Asha Bhosle felt Vivian Richards looks like Nana Patekar)

यावेळी विवियनला भेटल्यानंतर गायिका आशा भोसलेंनी त्याची तुलना अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी केली. यावर नीना यांनी उत्तर दिलं होतं, 'तो (विवियन) नानांपेक्षा चांगला दिसतो.' यावेळी आशा यांनी नाना पाटेकर यांना भेटलीस का, असा प्रश्न नीना यांना विचारला. त्यावर नीना यांनी नकारार्थी उत्तर दिलं. या कार्यक्रमात नीना आणि विवियन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं रिलेशनशिप ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. मसाबासाठी नीना आणि विवियन यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मसाबा हे नाव सध्या फॅशन विश्वातील फार प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांसाठी ती फॅशन डिझायनिंग करत असून 'हाऊस ऑफ मसाबा' या नावाने तिचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT