मनोरंजन

'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ

हे दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे.

स्वाती वेमूल

तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर जोडी म्हणजे समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य अक्किनेनी Akkineni Naga Chaitanya. गेल्या काही आठवड्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. मात्र या चर्चांवर अद्याप समंथा किंवा नाग चैतन्यने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ट्विटरवरील काही गोष्टींवरून समंथाकडून इशारा देण्यात येत आहे, मात्र नाग चैतन्यने पूर्णपणे मौन बाळगणं पसंत केलं आहे. समंथाने सोशल मीडिया अकाऊंटवर अक्किनेनी हे आडनाव काढून टाकल्यापासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. अक्किनेनी कुटुंबात नेमकं काय बिनसलंय, हे कोणालाच माहित नाही.

समंथाला लहानपणापासूनच चित्रपटांची फार आवड आहे. चेन्नईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या समंथाला तिच्या दमदार अभिनयकौशल्यामुळे प्रसिद्धी मिळाली. लग्नानंतरही तिने काम सुरू ठेवलं. समंथाचे काही फोटोशूट्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. चैतन्य आणि नागार्जुन यांना ही गोष्ट खटकत होती. या दोघांनी तिच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने काही फरक पडला नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, इथूनच दोन्ही कुटुंबांमध्ये वादाला सुरुवात झाली. याचवेळी समंथाने 'फॅमिली मॅन २' या वेब सीरिजची ऑफर स्वीकारली होती. या सीरिजमध्ये तिने दमदार भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. मात्र हीच गोष्ट अक्किनेनी कुटुंबाला आवडली नाही. करिअरसंदर्भातील समंथाच्या निवडी त्यांना खटकू लागल्या आणि हळूहळू या दोघांमध्ये दुरावा वाढू लागला.

नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी समंथा आणि नाग चैतन्यने वैवाहिक सल्लागारांची मदत घेतली. मात्र हे दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली. घटस्फोटानंतर समंथाला जवळपास ५० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT