Heropanti news  esakal
मनोरंजन

Heropanti Trailer: 'बबलु ढुंढनेसे नही किस्मत से मिलता है'

प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ (Tiger Shoff) एवढीच टायगरची ओळख नाही.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood Movies: प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ (Tiger Shoff) एवढीच टायगरची ओळख नाही. त्यानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये स्वताच्या नावाचा वेगळा ठसा बॉलीवूडमध्ये उमटवला आहे. बॉलीवूडमध्ये (Heropanti 2) सध्याच्या घडीला लोकप्रिय अॅक्शन हिरो म्हणून टायगरचे नाव (Bollywood Actors) घेतले जातो. ऋतिक रोशनला आपला आदर्श मानणाऱ्या टायगरच्या डान्सचे मोठ्या प्रमाणावर कौतूक होताना दिसते. आता त्याचा हिरोपंती 2 चा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये टायगरच्या स्टंटबाजीचं कौतूक नेटकऱ्यांनी केलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून टायगरच्या या चित्रपटाची चर्चा होती.

साजिद नाडियावाला प्रस्तुत हिरोपंतीच्या 2 ट्रेलरला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सही दिल्या आहेत. 2014 मध्ये हिरोपंतीचा पहिला भाग आला होता. या चित्रपटामध्ये टायगरसोबत नवाझुद्दीन सिद्धीकी प्रमुख भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये टायगरच्या स्टंटबाजीनं नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. हिरोपंती 2 हा सायबर क्राईमवर आधारित असणारा चित्रपट आहे. यामध्ये टायगरनं बबलुची भूमिका साकारली आहे. तर नवाझुद्दीन लैलाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला नवाझुद्दीन त्याच्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. जगभरामध्ये जे काही सायबर क्राईम होते आहे त्यामागे लैलाचा हात आहे असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे ते लैलाच्या बंदोबस्तासाठी बबलुकडे विशेष कामगिरी सोपवतात.

बबलुची ओळखच एका लक्षवेधी संवादानं होते. त्यात तो म्हणतो बबलु हा शोधून सापडत नाही त्यासाठी हवी नशीबाची साथ. अशा संवादानं टायगरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यत या ट्रेलरला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. चित्रपटामध्ये तारा सुतारिया आहे. तारा, टायगर आणि नवाझुद्दीनं आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा ट्रेलर शेयर केला आहे. हिरोपंतीचे दिग्दर्शन अहमद खाननं केलं आहे. हा चित्रपट येत्या 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT