bbm memes 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 3: स्पर्धकांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा भन्नाट मीम्स

सोशल मीडियावर या एका स्पर्धकाची जोरदार चर्चा

स्वाती वेमूल

बऱ्याच प्रतीक्षेनंतर बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व Bigg Boss Marathi 3 प्रेक्षकांच्या भेटीस आलं. एकूण १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरात एकत्र राहायला आले आणि अगदी पहिल्या दिवसापासून काही स्पर्धकांनी भांडणाला सुरुवात केली. बिग बॉस हा सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. पहिल्या दिवसापासून या शोची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. काही स्पर्धकांबद्दल भन्नाट मीम्ससुद्धा Bigg Boss Marathi Memes व्हायरल होऊ लागले आहेत. काही स्पर्धक त्यांच्या फॅशनमुळे तर काही त्यांच्या डायलॉगमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावरील मीम्समध्ये सर्वाधिक चर्चा अभिनेत्री मीरा जगन्नाथची होऊ लागली आहे. मीरा तिच्या अनोख्या फॅशनमुळे आणि इतर स्पर्धकांसोबत वादामुळे चर्चेत आली आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत मीराने मोमोची भूमिका साकारली होती. यानंतर ती 'सर्वांत आकर्षक महिला' या यादीतही स्थान पटकावलं होतं. पहिल्याच दिवशी मीराचं जय दुधाणे आणि स्नेहा वाघ यांच्याशी भांडण झालं. यावरूनही भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात तब्बल ९० दिवस राहण्यासाठी आली आहेत. यापैकी काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात. ९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क इमाने इतबारे पूर्ण करत स्वत:ला सिद्ध करून दाखवायची चुरस या सगळ्याच सदस्यांमध्ये असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

SCROLL FOR NEXT