ranveer instagram
मनोरंजन

'ये बंदा गलती से पृथ्वी पर आ गया'; रणवीरच्या फॅशनवर भन्नाट मीम्स व्हायरल

विचित्र फॅशन सेन्समुळे रणवीर सिंग सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.

स्वाती वेमूल

अभिनेता रणवीर सिंग Ranveer Singh त्याच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. भलत्याच रंगाचे कपडे, भलतीच हेअरस्टाइल आणि त्यावर भलत्याच रंगसंगतीचे दागिने असा त्याचा विचित्र लूक याआधीही चाहत्यांनी पाहिला आहे. आता पुन्हा एकदा रणवीर सिंग सोशल मीडियावर त्याच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत आला आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रणवीरच्या या फॅशनवर विनोदी मीम्ससुद्धा ट्विटरवर व्हायरल होऊ लागले आहेत. (hilarious memes viral on ranveer singh new fashion latest look)

रणवीरचे हे फोटो पाहून फक्त त्याचे चाहतेच नाही तर इंडस्ट्रीतील त्याचे मित्रसुद्धा अवाक् झाले आहेत. अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, झोया अख्तर, आलिया भट्ट, हिमेश रेशमियाँ यांनी त्याच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'ये बंदा गलती से पृथ्वी मे आ गया', असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर त्याने दिलेली पोझ पाहून 'जनरल कम्पार्टमेंटमध्ये मित्रांसाठी जागा अडवाताना', अशी भन्नाट कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली आहे. काहींनी रणवीरची पत्नी दीपिका पदुकोणची काय प्रतिक्रिया असू शकते, यावरुनही मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी बोलायचे झाल्यास, तो लवकरच '८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर जयेशभाई जोरदार, सर्कस या चित्रपटांमध्येही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh news: एक अनोखे गाव जिथे ३७ वर्षांपासून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नाही; प्रेम आणि एकजुटीसाठी युपीमध्ये ठरत आहे आदर्श

Ajit Pawar: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; अजित पवार यांची ग्वाही, आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज

Latest Marathi News Live Update : परभणीतील कोक गावात दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना उलटी-जुलाबाचा त्रास

CM Devendra Fadnavis : सुधाकरपंत परिचारकांचा भाव सेवेकऱ्याचा होता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Virat Kohli ने सर्वांचा पोपट केला... 'ती' पोस्ट ना गौतम गंभीरसाठी होती, ना २०२७च्या वर्ल्ड कप साठी; मग नेमकं काय?

SCROLL FOR NEXT