कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांचा क्षेत्रांसोबतच मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. काम मिळत नसल्याने अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही जणांकडे औषधोपचारांसाठीही पैसे नाहीत. वयोवृद्ध कलाकारांची परिस्थिती याहूनही बिकट आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी Himani Shivpuri या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी व्यक्त झाल्या. "अशा संकटाच्या परिस्थितीत वृद्ध कलाकारांचे फार हाल होतात, कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधनच नसतं", अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. (Himani Shivpuri reveals there is no pf for actors says it is very tough)
चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांना पॉव्हिडंट फंडसारख्याही कोणत्या सुविधा नसतात, त्यामुळे बिकट परिस्थितीत त्यांच्याकडे पैसे मिळवण्याचा दुसरा कोणता मार्ग नसतो, असं त्या म्हणाल्या. मात्र अशा परिस्थितीतही खचून जाऊ नका आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना आणि इतर कलाकारांना केलं आहे.
"सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे वैद्यकिय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा वेळी आपणच आपली नीट काळजी घ्यायला हवी. घरीच राहून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर काम करावं", असा सल्ला त्यांनी दिला.
हिमानी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'मै प्रेम की दिवानी हूँ', 'हिरो नंबर १', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'मेहंदी' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.