मनोरंजन

'आनेवाला पल जानेवाला है, पप्पा तुमची आठवण येते...

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द अभिनेत्री हिना खानवर (hina khan ) महिनाभरापूर्वी शोककळा पसरली. तिच्या वडिलांचे गेल्या महिन्यात 20 तारखेला निधन झाले. तिनेच ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. हिना खान हिचे वडिल असलम खान (aslam khan ) यांनी हिनाला अभिनेत्री होण्यासाठी पाठींबा दिला होता. ते तिच्या पाठीशी उभे होते. हिनानं वडिलांच्या आठवणीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं त्यांच्याविषयीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती संपूर्ण परिवारासमवेत दिसून येत आहे. ( hina khan father aslam khan died of a heart attack on april 20 actress shared throwback video)

हिनानं (hina khan ) जो व्हिडिओ शेअर केला आहे तो चाहत्यांनी पाहिल्यानंतर त्यांना सुखद धक्का बसला आहे. हिनानं आपल्या वडिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. अशाप्रकारची भावना तिनं यावेळी व्यक्त केली आहे. ज्यावेळी हिनानं प्रत्यक्षात गिफ्ट दिले होते तेव्हा तिनं तो व्हिडिओ शुट केला होता. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात हिनाचा भाऊ आमिर खान, वडिल असलम खान आणि तिची आई हे दिसून येत आहे.

त्या व्हिडिओमध्ये परिवारातील सगळे लोक 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल (GOLMAL) चित्रपटातील आने वाला पल जाने वाला है, हे गाणं गाताना दिसत आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना हिनानं लिहिलं आहे की, आज वडिलांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला. पप्पा मला तुमची फार आठवण येते आहे. तुमच्याशिवाय राहणे शक्य नाही. यावेळी तिनं आपल्या भावनांना इमोजीच्या माध्यमातून व्यक्त करणं पसंत केलं आहे.

हिनाचा तो व्हिडिओ पाहून तिच्या फॅन्सलाही वाईट वाटलं आहे. त्यांनी हिनाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तिला कमेंट देताना आणखी खंबीर होण्यास सांगितले आहे. हिना तु जर अशाप्रकारे हार मानली तर तुझ्या परिवाराला कोण सांभाळेल असा सवालही त्यांनी हिनाला विचारला आहे. हद्यविकाराच्या झटक्यानं हिनाच्या वडिलांचा मृत्यु झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT