Prime Minister Narendra Modi And Abhijit Bichukale Google
मनोरंजन

हिंदी बिग बॉस बंद होण्याची चिन्ह?बिचुकले बरळला;थेट मोदीजींना म्हणाला..

'टिकट टू फिनाले' टास्कमध्ये शमिकाशी हुज्जत घालताना मजा म्हणून बोलला अनं फसला

प्रणाली मोरे

हिंदीतील बिग बॉस शो हा सुरू झाल्यापासून नेहमीच वादात राहिलेला आहे. पण या वादांमुळेच शो ला अनेक वर्षांचा यशस्वी प्रवास वाट्याला आला असं म्हटलं तर निश्चितच चुकीचं ठरू नये. यंदा सुरुवातीला शो ला टीआरपी मिळेना म्हणून वाहिनीनं शक्कल लढवली अनं वाइल्ड कार्ड एन्ट्रीनं काही स्पर्धक शो मध्ये घुसवले. आता राखी सावंत,अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) सारखी फाटक्या तोंडाची लोकं शो मध्ये आली तर टीआरपी वाढणारच नाही का. हो,अगदी झालंही तसंच. पण यावेळी स्पर्धकांच्या काहीबाही बरळण्यामुळे शो अनेकदा वादाच्या भोव-यात ओढला गेलाय.

राखी सावंत पेक्षाही यंदा अभिजित बिचुकलेमुळे घरात आणि घराच्या बोहरही अनेक वाद निर्माण झाले आहेत. बिचुकले हे सगळं मुद्दाम करतोय की ठरवून याचा अंदाज मात्र लावता येत नाही. अगदी देवोलिनाला किस करणं असू दे की शमितावर घाणेरडी काहीतरी कमेंट करणं असू दे ,त्यानं केव्हाच हद्द ओलांडल्याचं दिसतंय. पण आता तर त्यानं मोठ्या चक्रव्यूहात स्वतःला फसवून घेतलंय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोंदींच नाव घेत त्यानं असं काही भाष्य केलंय की आता वाहिनीच्या ऑफिसवर भाजपाचे मोर्चे न गेले तर नवलंच. सध्या वाहिनीनं या शो चा एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केलाय ज्यामध्ये नरेंद्र मोदींना लक्ष्य करीत अभिजित बिचुकले मजेमजेत टोकाचं बोलून बसलाय.

आपल्या भारत देशासाठी पंतप्रधान हे सगळ्यात मानाचं आणि उच्च दर्जाचं पद. त्यामुळे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काहीही बोलताना त्यांच्या विरोधी पक्षातले बडे बडे राजकीय नेतेही खूप विचार करून बोलतात. पण हे बिनडोक अभिजितला कळेल तर ना. तर त्याचं झालं असं की,सध्या हा शो अंतिम टप्प्यात आहे. ''टिकट टू फिनाले'चा टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकानं सांगायचं होतं की कोणता स्पर्धक फिनालेमध्ये जाण्यासाठी पात्र नाही ते. यावेळी शमिकानं बिचुकले कसा पात्र नाही याविषयी मुद्दे मांडले. पण तिला मजेमजेत क्रॉस जाताना बिचुकले म्हणाला,''माझ्यासमोर मोदीही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही''. आता थेट मोदी आले तरी माझी घाणेरडी भाषा मी बदलणार नाही असाच अर्थ होतो नाही का त्याचा. कारण बिचुकले कधी चांगली भाषा बोलताना वापरतो. आता त्याच्या या बोलण्यामुळे राजकारण तापलं अनं पेटलं तर वाहिनीच्या कार्यालयाचं काही खरं नाही आणि बिग बॉस शो चे ही. बंद नं झाला शो तर मिळवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT