Hindi Movie: Bhediya Twitter Review, Varun Dhawan And Kriti Sanon in lead Google
मनोरंजन

Bhediya Twitter Review: वरुण धवनचा 'भेडिया' पाहून पब्लिक कन्फ्यूज; प्रतिक्रिया देत म्हणू लागले...

अमर कौशिक दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी सिनेमाविषयी रिलीजआधी प्रेक्षकांमध्ये खरंतर खूप उत्सुकता होती.

प्रणाली मोरे

Bhediya Twitter Review: वरुण धवन,कृती सनन, अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल अभिनित 'भेडिया' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाविषयी आता लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली आहे. या सिनेमाला अमर कौशिकनं दिग्दर्शित केलं आहे. ज्यानं याआधी सुपरहिट सिनेमा 'स्त्री' चे देखील दिग्दर्शन केले होते. बॉलीवूडमध्ये याआधी 'भूलभूलैय्या','लक्ष्मी','रूही' आणि 'भूत पोलिस' सारखे सिनेमे बनले आहेत. आता पहावं लागेल की वरुण धवन आणि कृती सनन यांचा 'भेडिया' लोकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरला आहे.(Hindi Movie: Bhediya Twitter Review, Varun Dhawan And Kriti Sanon in lead)

'भेडिया' सिनेमाविषयी ट्वीटरवर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. कोणी सिनेमाला फ्लॉप म्हणतंय तर कोणाला वरुण धवनचा अभिनय भलताच आवडून गेला आहे. लोकांचे म्हणणे आहे की 'बदलापूर' नंतर 'भेडिया' वरुणचा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणता येईल,ज्यात त्यानं आपल्या अभिनयाचा कस लावलेला दिसून येत आहे. चला पाहूया ट्वीटरवर नेमक्या काय प्रतिक्रिया 'भेडिया' विषयी आल्या आहेत. आपण आता काही ट्वीटर लिंक पाहू ज्यात थेट लोकांनी नोंदवलेली त्यांची सिनेमाविषयीची संमिश्र मतं आपल्याला वाचायला मिळतील.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

काही लोकांना भेडिया सिनेमा खूप आवडला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'काय मस्त सिनेमा आहे'. त्यानं सिनेमाला ५ पैकी ५ स्टार दिले आहेत. वरुणच्या एका चाहत्यानं ट्वीट करत लिहिलं आहे की, 'भेडियाची प्रशंसा व्हायलाच हवी. वरुणनं खूप मेहनत केलीय. त्याच्या सिनेमाला चांगला रिव्हयू मिळणं आणि चांगलं यश मिळणं याचा तो हकदार आहे. मी आता खूपच भावूक झालोय कारण 'बदलापूर' नंतर वरुणचा हा दुसरा सिनेमा आहे,ज्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं असं वाटतंय'.

'भेडिया' सिनेमा अमर कौशिकनं दिग्दर्शित केला आहे. तर,दिनेश व्हिजाननं याची निर्मिती केली आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिनेशच्या युनिव्हर्स प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा आहे. यामध्ये दिल्लीमध्ये राहणाऱ्या कंत्राटदार भास्करची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्याला अरुणाचल प्रदेशच्या दाट जंगलात हायवे चा मुख्य रस्ता बनवण्याचं कंत्राट मिळतं. एके रात्री त्याला जंगलात 'भेडिया' चावतो आणि मग सुरु होते पुढची खरी कहाणी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT