historical marathi movie on veer murarbaji deshpande release date  sakal
मनोरंजन

नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर, 'या' दिवशी होणार रिलीज

‘वीर मुरारबाजी' यांचा पराक्रम आणि 'पुरंदरची युद्धगाथा' लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

नीलेश अडसूळ

Veer Murarbaji : सध्या ऐतिहासिक चित्रपटांची रांग लागली आहे. त्यातही शिव छत्रपतींचे चरित्र आणि मराठ्यांच्या इतिहास समोर ठेवून अनेक चित्रपट केले जात आहेत. नुकतेच पावनखिंड , शेर शिवराज हे सिनेमे येऊन गेले. तर 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुराळा करत आहे. नुकतंच महेश मांजरेकर यांनी 'वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली तर झी स्टुडिओने 'हर हर महादेव' या चित्रपटाची घोषणा केली. विशेष म्हणजे रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा आता रुपेरी पडदयावर येणार आहे. 'वीर मुरारबाजी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार आहे. (historical marathi movie on veer murarbaji deshpande release date)

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा मराठी रुपेरी पडदयावर पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ ला येण्यासाठी सज्ज होत आहे.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’ सारखा वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT