Ryan O' Neal Passes Away Esakal
मनोरंजन

Ryan O' Neal Passes Away: मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का! 'लव्ह स्टोरी'च्या फेम अभिनेत्याने निधन

Ryan O' Neal Passes Away: 70 च्या दशकात रायनने हॉलिवूड इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Vaishali Patil

Ryan O' Neal Passes Away: चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूड चित्रपट 'लव्ह स्टोरी'मधून जगभरात लोकप्रियता मिळवणारा प्रसिद्ध अभिनेता रायन ओ'नीलचे निधन झालं आहे. तो 82 वर्षाचा होता. 70 च्या दशकात त्यांने हॉलिवूड इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

रायन ओ'नीलच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. रायनच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र 2012 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे सांगण्यात आले होते. दिवंगत अभिनेता रायन ओ'नील त्यांच्या रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जायचे.

मिन्स्की आणि आर्थर हिलर दिग्दर्शित 'लव्ह स्टोरी' या चित्रपटात रायनने भूमिका साकारली होती. या चित्रपटात अली मॅकग्रॉ, जॉन मार्ले, रे मिलँड आणि टॉमी ली जोन्स सारखे कलाकार होते. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो.

रायन त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत होता. रायनचे नाव टॉप अभिनेत्री फराह फॉसेटसोबतही जोडले गेले होते. दोघांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच पसरल्या होत्या.

Ryan O'Neal च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने जवळपास 22 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1964 च्या नाईट टाईम सोप ऑपेरा 'पेटन प्लेस' यातून त्याला प्रसिद्ध मिळाली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. नेटकरी Ryan साठी पोस्ट शेयर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT