hollywood actress angelina jolie accuses ex husband brad pitt of domestic violence claims she has proof 
मनोरंजन

ऐकावं ते नवल, एंजेलिनानं असा आरोप केला, त्यामुळे ब्रॅड चक्रावला 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मोठमोठे दिग्गज सेलिब्रेटी जेव्हा त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे चर्चेत येतात तेव्हा त्याची मोठी बातमी होते. त्यांच्या चाहत्यांसाठी ती कदाचित धक्कादायक ती असू शकते. मात्र जे घडले त्याविषयी त्यांचं कुणी आपलं त्याबद्दल बोलत असेल तर मग त्याची दखल घ्यावी लागते. हॉलीवूडमधील प्रख्यात जोडपं म्हणून एकेकाळी ब्रॅड पिट आणि एंजेलिना जोलीचे उदाहरण सांगितले जायचं. आता संसार म्हटला की भांड्याला भांड हे लागणारचं. असे आपल्याकडे म्हटले जातं. त्यांच्याकडेही ती गोष्ट लागु होतीच. एंजेलिना आणि ब्रॅडच्या जोडीवरुन अनेक रंगतदार किस्सेही प्रसिध्द आहेत. सध्या एंजेलिनानं ब्रॅडवर जे आरोप केले आहेत त्यावरुन ती चर्चेत आली आहे.

एंजेलिना जोलीनं ब्रॅ़ड पिटवर मारहाणीचा आरोप केला आहे. तो मला मारहाण करायचा असे एंजेलिनानं म्हटलं आहे. आता त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. यावेळी एंजेलिनानं का आरोप केला असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तिचं म्हणणं आहे की, माझ्याजवळ असे अनेक पुरावे आहेत ज्यातून ब्रॅड मला मारहाण करत होता हे सिध्द होईल. 2016 मध्ये ब्रॅड आणि एंजेलिना हे वेगळे झाले. आता पाच वर्षांनी एंजेलिनानं ब्रॅडवर काही गंभीर आरोप केले आहेत. आरोप करुन ती थांबलेली नाही तर याबाबत तिनं कोर्टाकडे तक्रारही केली आहे. एंजेलिनानं म्हटले आहे की, ब्रॅडनं मला मारहाण केली त्याचे काही पुरावे माझ्य़ाकडे आहेत.

12 मार्चला एंजेलिनाची कोर्टात सुनावणी झाली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एंजेलिनानं त्यात असे म्हटले आहे की, जर कोर्टाला कुठल्य़ा पुराव्यांची गरज भासली तर ते माझ्याकडे आहेत. आणि ते मी कोर्टाला द्यायला तयार आहे. आणखी कुणाची साक्ष हवी असल्यास मी माझ्या मुलांनाही कोर्टासमोर आणायला तयार आहे. ब्रॅड आणि एंजेलिना यांना सहा मुले आहेत. त्यातील मॅडडॉक्स चे वय 19, पॅक्सचे 17, जहाराचे 16 आणि शिलोहचे 14 आहे. याशिवाय त्यांना नॉक्स आणि विवियन नावाची दोन जुळी मुले आहेत.

यु एस विकलीनं याविषयीचे एक वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात लिहिले आहे की, गेल्या साडेचार वर्षांपासून एंजेलिनानं ब्रॅडवर वेगवेगळे आरोप केले आहे. मात्र जे आरोप केले आहेत ते तिला सिध्द करता आलेले नाहीत. यापूर्वीही तिनं मुलांकडून ब्रॅडला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रॅडची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिनं वकिलांकडून काही कागदपत्रं मीडियासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT