मनोरंजन

प्रायव्हेट जेटमध्ये असं बसलं पाहिजे, प्रियंकाचा फोटो पाहाच!

बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेल्या प्रियंकाचा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर नेहमीच बोलबाला असतो.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेल्या प्रियंकाचा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर नेहमीच बोलबाला असतो. ती तिच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन तिनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. ती आता निर्मात्याच्या भूमिकेत आहे. तिच्या द व्हाईट टायगर नावाच्या चित्रपटाला वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनही मिळालं होतं. अशा प्रियंकाचा एक हटके फोटो सध्या सोशल मीडियावर व्हाय़रल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हॉलीवूड़मध्ये गेल्या काही वर्षांपासून आपल्या नावाचा ठसा उमटविण्य़ातही प्रियांकाला यश आलं आहे. परदेशी व्यक्तीसोबत लग्न करुन अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियंकानं बॉलीवूडमधील आपला चाहतावर्ग टिकवून ठेवला आहे. त्यांच्यासाठी ती अनेक गंमतीशीर पोस्ट शेयर करत असते.

सध्या सोशल मीडियावर प्रियांकानं एका प्रायवेट जेटचा (Priyanka Chopra private jet photo) फोटो शेयर केला आहे. त्यात ती चक्क मांडी घालून बसली आहे. तो फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट चाहत्यांनी नेटकऱ्यांनी केल्या आहेत. भारतीय बैठकची ओळख तिनं या फोटोतून करुन दिली आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया तिला मिळाल्या आहेत. तिच्या त्या देशी अंदाजातील फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका जोन्स चोप्रा ही द अॅक्टिव्हेस्टचा भाग झाल्यानं चर्चेत आली होती. त्यामुळे तिला चाहत्यांची माफीही मागावी लागली होती. त्या प्रकरणावरुन तिला ट्रोलही करण्यात आले होते. आताच्या तिच्या फोटोवर तिला इंडियावाली अशीही कमेंट एकानं दिली आहे.

इंटरनॅशनल पातळीवर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवलेल्या प्रियंकाचा बॉलीवूड प्रवास मोठा खडतर होता. मात्र आता ती मोठी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यात ती प्रयत्नशील असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या पतीसोबतचे हटके फोटोही तिनं पोस्ट केले आहेत. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रियंकाच्या टीमनं तिचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अशाप्रकारे प्रायव्हेट जेटमध्ये बसण्याचा हा सर्वोत्तम पर्याय अशीही कमेंट एकानं प्रियंकाला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT