Johnny Depp VS Amber Heard Esakal
मनोरंजन

Johnny Depp Amber Heard Divorce : आता बसं! मला यातून सुटका हवी...शेवटी एँबर हर्डची माघार...

सकाळ डिजिटल टीम

हॉलिवूडमध्ये स्टार कपलचं घटस्फोट घेन काही नवं नाही आहेत. यात्यातच सर्वात चर्चेत आलेलं नाव म्हणजे जॉनी डेप आणि एँबर हर्ड. स्टार अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वपत्नी एँबर हर्ड यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहेत. दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला असं असतानाही त्यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाही.

जॉनी डेपने काही महिन्यांपूर्वी एँबर हर्डविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. जॉनी डेप आणि एँबर हर्ड यांनी एकमेकांवर फक्त गंभीर आरोपच केले नाहीत, तर एकमेंकाविरुद्ध अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.आता या प्रकरणाला अजून एक वेगळं वळण आलं आहे आणि आता हे प्रकरण संपेल असं वाटतंय.

एँबर हर्ड हर्डने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले असताना, जॉनी डेपने देखील मानहानीचा खटला दाखल केला आणि त्याच्या बाजूने निकाल दिला. यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये करार होऊ शकला नसला तरी आता अखेर एँबर हर्डने या प्रकरणात तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, याआधी अभिनेत्रीने एक लांब पोस्ट शेअर केली आणि सांगितले की तिने ते कधीही निवडले नाही.

तिच्या माजी पतीने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या कोट्यवधी-डॉलरच्या मानहानीच्या खटल्यात ती तडजोड करण्याठी तयार झाली आहे, असं सांगण्यासाठी एँबर हर्डनं तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली, परंतु ती पुढे म्हणाली की हे खूप विचार केल्यानंतर करत आहे. त्यांनतर तिने खूप कठीण निर्णय घेतला आहे. तिचा माजी पती जॉनी डेपसोबत तिच्या मानहानीचा खटला सोडवावा पण मी हे कधीच निवडलं नाही असं म्हणायला हवं. "मी फक्त अजून एका खटला झेलू शकत नाही."

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

एँबर हर्डने तिच्या नोटमध्ये असेही म्हटले आहे की "मी अमेरिकन कायदा व्यवस्थेवर माझा विश्वास गमावल्यानंतर हा निर्णय घेत आहे. मात्र, मी माझ्या सत्याचा बचाव करण्याचा पर्यंत केला. या प्रकरणामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आणि या दरम्यान मला सोशल मीडियावर खूप अपमानाचा सामना करावा लागला की महिला जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांचा छळ होतो आणि माझ्यासोबतही असचं घडले आणि आता या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. हा निर्णय घेतला आहे.

पुढे अंबर हर्ड म्हणाली, 'वेळ खूप मौल्यवान आहे आणि आता मला माझ्या उद्देशानुसार माझा वेळ घालवायचा आहे .कारण या प्रकरणामुळे मी अनेक वर्षांपासून कायदेशीर कारवाईत अडकलेली होती. या सर्व गोष्टींसोबतच अभिनेत्रीने तिच्या चिठ्ठीत आणखीही अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT