Doctor Strange Actress Zara Phythian Jailed
Doctor Strange Actress Zara Phythian Jailed  esakal
मनोरंजन

Doctor Strange: फेम अभिनेत्री झारा गजाआड, 8 वर्षांची शिक्षा: लहान मुलांसोबत...

युगंधर ताजणे

Doctor Strange Actress Zara Phythian Jailed for child sex offences: हॉलीवूडचा डॉक्टर स्ट्रेंज नावाचा चित्रपट सध्या जगभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. (Hollywood News) अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट जसा त्याच्यातील ग्राफिक्स, अॅक्शन सीन, थरार यामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे (Hollywood Actor - Actress) तसा तो आणखी एका वेगळ्या कारणासाठी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. ते कारण म्हणजे या (Doctor Strange) चित्रपटातील मुख्य अभिनेत्री असणाऱ्या झारा फिथियनला आठ वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप तिच्यावर होता. ही बातमी ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरुन झाराविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

केवळ झारालाच (Zara Phythian) नव्हे तर तिच्या पतीला व्हिक्टर मार्का यांना देखील 14 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चाईल्ड सेक्स हे प्रकरण झाराला भोवलं आहे. तिच्याविरोधात जे आरोप करण्यात आले होते ते कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानं तिला आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नॉटिंगहम क्राऊन कोर्टामध्ये अभिनेत्रीचा खटला सुरु होता. झारा फिथियनवर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. हे प्रकरण 2005 ते 2008 च्या दरम्यानचे आहे. झाराला शिक्षा सुनावल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर हॉलीवूड हादरले आहे. एकीकडे डॉ.स्ट्रेंजची लोकप्रियता शिखरावर असताना त्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीला झालेली शिक्षा चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

Doctor Strange Actress Zara Phythian Jailed for child sex offences

यावेळी कोर्टानं झाराच्या 569 वर्षीय पती व्हिक्टर मार्काला देखील दोषी ठरवलं असून त्याला 14 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. अल्पवयीन मुलींना छेडणं, त्यांच्याशी लैंगिक वर्तन करणं, अश्लील व्यवहार कऱणं असे आरोप व्हिक्टरवर होते. दोन्ही पती पत्नीला झालेल्या शिक्षेनं हॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढील काळात या दोन्ही कलाकारांना लहान मुलांसोबत काम करु दिले जाणार नाही. असेही कोर्टानं सांगितलं आहे. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर व्हिक्टर यांना रडु कोसळले. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र चाहत्यांना अस्वस्थ करणारे होते. व्हिक्टर आणि झारावर वेगवेगळ्या प्रकारचे 14 आरोप करण्यात आले होते. मात्र कोर्टानं त्यांना दोषी ठरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT