Hollywood Pop singer britney spears shares her topless photo..  Instagram
मनोरंजन

Hollywood पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचे बाथरुममधील चक्क पाच व्हिडीओ व्हायरल; नवऱ्यानेही जोडले हात..म्हणाला..

ब्रिटनी स्पेअर अनेकदा खळबळजनक पोस्ट करते अन् चर्चेतही आलेली पहायला मिळते.

प्रणाली मोरे

ब्रिटनी स्पीयर्सने ५ तासात ५ पोस्ट केल्यात. यातील एका फोटोत तिनं 'मेक्सिकोतली रात्र..' म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ब्रिटनी मिट्ट काळोखात डान्स करताना दिसतेय. ब्रिटनीनं लिहिलं आहे की ,''ती आपल्या वाढदिवशी मेक्सिकोच्या एका हॉटेलात डान्स करत होती''. याव्यतिरिक्त ब्रिटनीनं आपले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत,जे आंघोळीच्या ठीक आधीचे आहेत.

ब्रिटनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे की,''याला मी मेक्सिको एमएक्स सोबत शेअर करत आहे''. तिनं लिहिलं आहे,''खरं विचाराल तर मला याची काहीच कल्पना नाही,पण मी आता आधीपेक्षा खूप स्पष्ट पाहू शकते. मी २ तास शॉवरखाली आंघोळ केली. पाण्याखाली शूटिंग करण्यात खास गोष्ट आहे,मला माझ्या डोळ्यांना पहायचं होतं''.

ब्रिटनीनं आपल्या डोळ्यांच्याच वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स देत काही आणखी व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. तिनं लिहिलं आहे की, ''हा माझा शॉवर घेण्याआधीचा फोटो आहे''. ब्रिटनीनं आपल्या पोस्टचा कमेंट बॉक्स मात्र बंद ठेवला आहे. या व्हिडीओत ब्रिटनी जशी दिसतेय त्यामधनं एक तर क्लीअर होतय, ते म्हणजे तिला कुठलीतरी चिंता सतावतेय.

माहितीसाठी सांगतो की, २००८ पासून ब्रिटनीचा ताबा हा तिचे वडील जेनी स्पीयर्स यांच्याकडे होता,जो गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये संपला आहे. याचा अर्थ असा आहे की ब्रिटनीचे वडीलच तिचे सगळे आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले सगळे निर्णय घेत होते. वडीलांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रिटनीचा ताबा होता म्हणूनच तिचं आयुष्य वाचलं. पण इथे एक गोष्ट आहे ती म्हणजे वडीलांच्या बंधनातून मुक्त झाल्यावर ब्रिटनी स्वतःच्या स्वातंत्र्यावर खूश झालेली दिसली. पण जेमी यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की,''भले लोकांना हे खरे वाटो की न वाटो पण माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. आणि तिच्या आयुष्यावर मी कंट्रोल ठेवलं होतं म्हणूनच ती वाचली''.

ब्रिटनीनं यावर्षीच ९ जून रोजी आपला बॉयफ्रेंड सॅम असगरी सोबत लग्न केलं. ते दोघे तब्बल सहा वर्ष रीलेशनशीपमध्ये होते. ब्रिटनी ज्या पद्धतीचे टॉपलेस आणि अर्ध नग्न अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते ते पाहून आपल्याला कसं वाटतं याविषयी तिच्या नवऱ्यानं देखील पोस्ट केली आहे. तो म्हणाला आहे, ''ब्रिटनीनं असे फोटो पोस्ट करु नये असं मला वैयक्तिक पातळीवर वाटतं. पण मी कोण आहे तिला हे असं करण्यापासून थांबवणारा जो स्वतः कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये राहिला आहे''. य़ाआधी ब्रिटनीच्या पहिल्या नवऱ्यानं देखील ब्रिटनीच्या अशा वागण्यावर आक्षेप घेत म्हटलं होतं,''हिच्या अशा वागण्यामुळे तिची मुलं देखील तिला टाळतात आणि त्यांना ब्रिटनी सोबत संबंध ठेवायचे नाहीत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT