honey singh Sakal
मनोरंजन

Honey Singh: 'तूच खरा किंग', हनी सिंगने सफाई कामगारासोबत स्टेजवर केला जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल

यो यो हनी सिंगचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हनी सिंग एका सफाई कामगारासोबत स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगला वेगळ्या ओळखीची गरज नाही. अलीकडेच हनी सिंगने त्याच्या लेटेस्ट अल्बम हनी सिंग 3.0 च्या माध्यमातून अनेक वर्षांनी पुनरागमन केले आहे. हनी सिंगचे नाव त्याच्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे.

दरम्यान, यो यो हनी सिंगचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हनी सिंग एका सफाई कामगारासोबत स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हनी सिंगचा हा व्हिडिओ पाहून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच सिंगरचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

यो यो हनी सिंगचे नाव त्याच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. इंडस्ट्रीतील निवडक गायक आणि रॅपर्समध्ये हनी सिंगच्या नावाचा समावेश आहे. हनी सिंगच्या फॅनच्या यूट्यूब चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हनी सिंगचा हा व्हिडिओ जयपूरमधील त्याच्या एका संगीत कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये यो यो हनी सिंग सफाई कामगारासोबत डान्स करताना दिसत आहे.

हनी सिंगने जबरदस्ती केल्यावर, डेनिम शर्ट घातलेला मुलगा झाडू फेकतो आणि यो यो हनी सिंगसोबत जबरदस्त डान्स करू लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण हनी सिंगचे खूप कौतुक करत आहेत कारण एक प्रसिद्ध गायक आणि रॅपर असूनही हनी सिंगने त्या सफाई कामगाराबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आणि मनमोकळेपणाने एन्जॉय केला आहे.

यो यो हनी सिंगचा सफाई कामगारासोबत स्टेजवरचा हा अप्रतिम डान्स व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. यासोबतच चाहते हनी सिंगच्या या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. हनी सिंगच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की- हनी सिंग हा म्युझिक इंडस्ट्रीचा किंग आहे. अशा प्रकारे हनी सिंगच्या या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT