Honey Singh Divorce esakal news
मनोरंजन

Honey Singh Divorce: 'हनी' कडून 'मनी' घेऊन शालिनीचा काडीमोड!

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या वैवाहित आयुष्यात वादळ निर्माण झालं आहे

युगंधर ताजणे

Honey Singh Divorce: बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या वैवाहित आयुष्यात वादळ निर्माण झालं आहे. काही दिवसांपासून हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवा यांच्यात वाद सुरु होता. (Bollywood couples) अखेर त्याची परिणीती ही घटस्फोटात झाली आहे. सोशल मीडियावर देखील त्याची चर्चा होती. हनी सिंगच्या चाहत्यांनी देखील त्याबाबत हनीला विचारणा केली होती. अखेर त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले (entertainment news) असून यो यो हनी सिंगनं मोठी रक्कम घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दहा वर्षांचा संसार हा आता संपुष्टात आला असून त्याबाबत हनी सिंगच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंजाबी गायक हनी सिंग हा त्याच्या वेगळ्या शैलीतील गायनासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. अखेर त्यांचा घटस्फोट झाला असून कोट्यवधी रुपयांची पोटगी हनी सिंगनं शालिनीला दिल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. फिल्म क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला लोकप्रिय गायक म्हणून यो यो हनी सिंगची ओळख आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील तीस हजारी कोर्टामध्ये त्याच्या घटस्फोटाचा खटला सुरु होता. त्यात त्यानं घरगुती हिंसाचारासमवेत, इतर महिलांशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप होता.

यामुळे त्याच्या पत्नीनं शालिनीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. हाती आलेल्या माहितीनुसार शालिनीनं हनी सिंगकडून एक कोटी रुपयांची पोटगी घेऊन हनी सिंगसोबत संबंध तोडले आहेत. त्याच्याकडून घटस्फोट घेतला आहे. कोर्टानं हनी सिंगला 28 ऑगस्ट 2021 रोजी नोटीस धाडली होती. अखेर शालिनी आणि हनी सिंग यांच्यातील घटस्फोट होऊन त्यातील अटी, शर्ती यासमोर आल्या आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 20 मार्च 2023 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शालिनीनं आपल्या जबाबात सांगितले होते की, हनी सिंगनं तिच्यासोबत हाणामारी केली होती. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊनही संवाद नव्हता. कायम वेगवेगळ्या गोष्टींवरुन भांडणं होत असायची. यामुळे शालिनीनं हनी सिंगच्या विरोधात कौटूंबिक हिंसाचाराचा आरोप करुन त्याच्याकडून मोठी पोटगी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT