Honey Singh praises Urfi Javed said Every girl should learn something from her sakal
मनोरंजन

Urfi Javed : मुलींनो उर्फीचा आदर्श घ्या! हनी सिंगकडून तोंडभरून कौतुक.. कारण ऐकून तुम्हीही..

गायक हनी सिंग उर्फीच्या बाजूने..

नीलेश अडसूळ

Honey singh speaks about Urfi javed : आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या रडारवर आलेली उर्फी जावेद सध्या प्रचंड चर्चेत आहे. उर्फी विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला आहे. तर उर्फीही भाजप आणि चित्रा वाघ यांना तोडीस तोड उत्तर देत आहे. एकीकडे भाजप उर्फी विरोधात आक्रमक होत असतानाच गायक हनी सिंगने मात्र उर्फीची पाठराखण केली आहे.

(Honey Singh praises Urfi Javed said Every girl should learn something from her)

बॉलिवूडचा रॅपर आणि गायक हनी सिंगने नुकतंच उर्फीबद्दल एक वक्तव्य केलं. यामध्ये हनीने चक्क उर्फीच कौतुक केलं आहे. त्यामुळे एकीकडे उर्फी वादात अडकली असताना तिचे कौतुक केल्याने हनी सिंगवरही आता टीका होऊ लागली आहे.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हनी सिंगने यावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, 'मला ही मुलगी प्रचंड आवडते. ती प्रचंड बोल्ड आणि धाडसी आहे. स्वतःचं आयुष्य ती स्वतःच्या अटींवर जगते. देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं.' शिवाय तो लवकरच तिच्याबरोबर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हनी सिंगने तिचं कौतुक केल्या बद्दल आता त्यालाही लोक ट्रोल करू लागले आहे. पण हनीच नाही तर अनेकांनी उर्फीला यावेळी पाठिंबा दिला आहे. 'ती जे करते आहे, तो तिच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. पूर्ण यंग झाकूनही आपल्याकडे महिलांवर अत्याचार होतच आहे.त्यामुळे तिच्या वर गुन्हा दाखल करण्या एवढे काहीही झालेले नाही,' असे मत सोशल् मिडियावर अनेकांनी मांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT