honey singh honey singh
मनोरंजन

हनीसिंग नागपूर पोलिसांसमोर; पोलिस उपायुक्तांसमोर दिले आवाजाचे नमुने

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अश्‍लील नृत्य व गीते सादर केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात आवाजाचे नमुने देण्यासाठी यो यो हनी सिंगला (Honey Singh) १२ फेब्रुवारीला पाचपावली पोलिसांपुढे हजर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अखेर शनिवारी उशिरा नागपुरात दाखल झाला. आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त राजमाने यांच्या समोर यो यो हनी सिंग याने आवाजाचे नमुने दिले.

यो यो हनीसिंग (Honey Singh) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ तारखेला त्याला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, शनिवारी रात्री आल्याने यावेळी तो पाचपावली पोलिस ठाण्यात पोहचू शकला नाही. त्यामुळे आज सकाळी त्याला ठाण्यात बोलाविण्यात आले. मात्र, सुरक्षेचे कारण देत, त्याने ठाण्यात येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात असलेल्या परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त राजमाने यांच्या कार्यालयात बोलाविण्यात आले. दुपारी दीड वाजता तो कोतवाली ठाण्यात वकीलासह उपस्थित झाला. यावेळी पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले. जवळपास साडेचार तासानंतर सायंकाळी सहा वाजता त्याला सोडण्यात आले.

असे आहे प्रकरण

हनी सिंगने (Honey Singh) यूट्युबवर अत्यंत अश्‍लील गीते अपलोड केली असल्याचा आरोप करणारी तक्रार आनंदपाल सिंग गुरमान सिंग जब्बल यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात २०१५ साली दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, हनीसिंगला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यावेळी फौजदारी तक्रारीच्या तपासाच्या वेळी आवश्यकता पडेल तेव्हा पोलिसांना सहकार्य करावे आणि देश सोडून कुठेही जावू नये, अशा अटी हनीसिंगला घालण्यात आल्या होत्या.

अनेकदा गैरहजर

यो यो हनीसिंग याला यापूर्वीही पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, विदेशी प्रवासाची कारणे देत, तो गैरहजर राहीला होता. मात्र, त्याने ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यात हजर रहावे व आवाजे नमुने देत तपासात सहकार्य करावे, असेही आदेश नमूद करण्यात आले होते. परंतु, त्याने या कालावधीतही पोलिस ठाण्यात हजेरी लावली नाही. याउलट नव्याने पाचपावली पोलिसांनी त्याला बजाविलेला समन्स अवैध असून तो रद्द करण्यात यावा यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांच्यापुढे अर्ज सादर केला. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत हनी सिंगला १२ फेब्रुवारी अर्थात शनिवारी पोलिसांपुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT