vishal nikam 
मनोरंजन

असे साकारले जातात 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेतील अ‍ॅक्शन सीन

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. असुरांचा संहार करण्यासाठी ज्योतिबाने अवतारी रुप धारण केलं आहे. हा संहार करताना दाखवले जाणारे युद्धाचे प्रसंग कसे शूट केले जातात याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे युद्धाचे प्रसंग शूट करणं हे संपूर्ण टीमसाठी मोठं आव्हान असतं. ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमसोबतच दिग्दर्शक शैलेश ढेरे आणि नितीन काटकर, सेटवरची तंत्रज्ञ मंडळी, या सीनला भव्यदिव्य रुप देणारे व्हिज्युअल्स ग्राफिक्स टीम आणि फाइट मास्टर सूरज ढोली यांची प्रचंड मेहनत आहे. 

पडद्यावर अवघे काही मिनिटं दिसणाऱ्या या सीक्वेन्सची तयारी दोन दिवस आधीपासूनच सुरू असते. मालिकेतल्या या अॅक्शन सीक्वेन्सविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, "आमच्या संपूर्ण टीमसाठी ही मालिका साकारणं म्हणजे एक आव्हान आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये असुर रुधोचन आणि ज्योतिबामध्ये युद्ध होणार आहे. या सीक्वेन्सची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या पारंपरिक खेळांची कला मला अवगत असल्यामुळे त्याचा सीन करताना खूप फायदा होतो."

कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. २३ ऑक्टोबर २०२० पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' ही मालिका दररोज संध्याकाळी ६ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते. 

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. संशोधक आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात ते परिचित आहेत. कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापिक संचालक संजय पाटील यांचं देखिल या मालिकेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT