How Kapil Sharma got chance to host the kapil sharma show Google
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो' ची आयडिया कशी सुचली? मजेदार किस्सा शेअर करत कपिल म्हणाला..

खरंतर 'द कपिल शर्मा शो' ची संकल्पना कपिलला सुचण्यामागे 'झलक दिखला जा' या शो चा मोठा वाटा आहे. एका मुलाखतीत कपिलनं याविषयी खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' छोट्या पडद्यावरचा कॉमेडी शो आहे, या शो चे जगभरात तगडे फॅनफॉलॉइंग आहेत. हा शो ना केवळ प्रेक्षकांना खळखळवून हसवतो तर या शो ने अनेक कलाकारांचं करिअर घडवण्यासही मदत केली आहे. या कलाकारांमध्ये कपिल शर्माचं नाव पहिल्या क्रमांकावर घेता येईल. कपिल शर्मा शो ने कॉमेडी किंगच्या करिअरला नवी दिशा दिली आहे. हेच कारण आहे की त्याला थोरा-मोठ्यांपासून सगळेच ओळखतात. अर्थात आपल्यापैकी अनेकजण या शो चे चाहतेही असाल. पण आपल्या सगळ्यांना माहित आहे का की कपिल शर्माला हा शो कसा मिळाला? चला,आता जाणून घेऊया याविषयी.(How Kapil Sharma got chance to host the kapil sharma show)

असं म्हणतात की ज्याच्या नशीबात जे आहे ते त्याला मिळतच. कपिल शर्मासोबतही असंच काहीसं घडलं आहे. 'द कपिल शर्मा' शो सुरू होण्याआधी कपिलला 'झलक दिखला जा' शो ची ऑफर होती. हा डान्स रिअॅलिटी शो कपिलला मनिष पॉलसोबत होस्ट करायचा होता. ऑफर चांगली होती म्हणून कपिलही झटकन रेडी झाला.

एका मुलाखती दरम्यान बोलताना कपिल शर्मा म्हणाला होता की, तो 'झलक दिखला जा' कार्यक्रमाच्या निमित्तानं कलर्स वाहिनीच्या ऑफिसला गेला होता. तिथून त्याला बीबीसी नावाच्या एका प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसला पाठवण्यात आलं. कपिल म्हणाला की,त्या प्रॉडक्शन हाऊसकडून त्याच्या तेव्हाच्या वजनदार अंगकाठीवरनं प्रश्न निर्माण केले गेले. कपिला सांगितलं गेलं की,तुमचं वजन खूप जास्त आहे. स्क्रीनवर तुम्ही जाड दिसाल. कपिलला त्यांचे हे बोलणे खटकले आणि त्यानं कलर्स वाहिनीला यासंदर्भात स्पष्ट सांगितले.

यानंतर चॅनेलकडून प्रॉडक्शन हाऊसला सांगितलं गेलं की मुलगा चांगला आहे. याला होस्ट म्हणून लॉंच करूया,नंतर तो वजन कमी करेल. पण कपिल तसा तल्लख बुद्धीचा,हजरजबाबी. त्यानं कलर्स वाहिनीला सांगितलं की,तुम्ही एखाद्या कॉमेडी शो च्या निर्मितीचा विचार का नाही करत? कपिलचं हे बोलणं ऐकल्यावर चॅनेलने त्याला कॉमेडी चॅट शो संदर्भात आयडिया शेअर करायला सांगितली. कपिलनं याविषयी दोन दिवसाचा वेळ मागितला आणि त्यानं ते करून दाखवलं की जे त्याला करणं पसंत होतं.

कपिलनं दोन दिवसांत कॉमेडीतील आपल्या अनुभवाचा सगळा कस पणाला लावत अखेर कलर्सला 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' कार्यक्रमाची आयडिया देऊन टाकली. यादरम्यान कपिलला हा शो किती दिवसांपर्यंत चालेल याविषयी देखील चॅनेलने कल्पना देण्यास सांगितले. पुढे पुढे कपिलनं आपल्या कामातून चॅनेलच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले. त्या मुलाखतीत कपिल म्हणाला की,जेव्हा पहिल्यांदा कपिल शर्मा शो चे शूटिंग सुरू झाले होते, तेव्हा तो तब्बल १२० मिनिट चालला. पण तेव्हा चॅनेलला फक्त ७० मिनिटांचा कंटेट हवा होता. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शो ने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. काही वर्षांनी हा शो सोनी वाहिनीवर प्रसारित होऊ लागला. आता लोक प्रतिक्षेत आहेत या शो च्या नव्या सिझनच्या. 'द कपिल शर्मा शो' १० सप्टेंबर रोजी टी.व्ही वर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सीबीआय अधिकाऱ्यांच्या १२ सदस्यांच्या पथकाने चेंगराचेंगरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली

SCROLL FOR NEXT