how usha nadkarni reacts after watching her mimicry by shreya bugde bus bai bus zee marathi  sakal
मनोरंजन

'माहेरच्या साडी'तल्या सासूची श्रेया बुगडेला भीती! हे आहे कारण..

उषा नाडकर्णींची नक्कल करणं श्रेया बुगडेला चांगलंच महागात पडलं..

नीलेश अडसूळ

shreya bugde : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. नुकतीच अभिनेत्री श्रेया बुगडे हिने हजेरी लावली होती. यावेळी तिने एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये ती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना घाबरत असल्याचे दिसून आले आहे. (how usha nadkarni reacts after watching her mimicry by shreya bugde bus bai bus zee marathi )

आपल्याला माहीतच आहे की 'माहेरची साडी' या चित्रपटातील सासूची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (usha nadkarni) या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात, त्यांचा दरारा आणि कडक भाषाशैली यामुळे त्यांचा वेगळा दबदबा आहे. त्यांना मनोरंजन विश्वात बरेच कलाकार घाबरून असतात. त्यापैकीच एक श्रेया बुगडे आहे.

मध्यंतरी श्रेयाने अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या शैलीत एक स्किट सादर केले. यावेळी श्रेयाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ कुणीतरी उषा नाडकर्णी यांना दाखवला आणि सांगितलं की श्रेया बुगडे तुझी मिमीक्री करत आहे. हा व्हिडिओ पाहून उषा ताईंनी थेट श्रेयाला कॉल केला. हाच किस्सा तिने झी मराठी वरील बस बाई बस या कार्यक्रमात सांगितला, श्रेया म्हणते, 'उषा ताईंचा कॉल आलेला पाहून मी घाबरले. मला वाटलं आता आपली काही खैर नाही. म्हणून मी थेट कॉल उचलला आणि माफी मागायलाच सुरुवात केली. 'आऊ.. मी असं परत करणार नाही,मला माहितीय माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर, हव तर मार मला'

पुढे ती म्हणाली, 'त्या थोडावेळ थांबल्या आणि मग म्हणाल्या, 'काय झालं गं.. अगं बरं केलंस तू.. छान करतेस. मी काही ते बघितलं नाही. मला कुणीतरी फोन केला की ती श्रेया बुगडे तुझी नक्कल करतेय म्हणून.. आणि व्हिडिओ पण पाठवला. म्हणून मी बघितलं. चांगलं केलंस. पण दुसरं कुणी केलं ना तर मी नाय ते खपवून घेणार' श्रेया आणि उषा नाडकर्णी यांच्यातील हा संवाद नुकताच तिने बस बाई बस कार्यक्रमात सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

Ajit Pawar Death News LIVE Updates : ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही - एकनाथ शिंदे

IND vs NZ, 4th T20I: न्यूझीलंडची दणक्यात सुरुवात, नंतर भारतीय गोलंदाजांनीही दाखवला क्लास; पण तरी विजयासाठी विक्रमी धावांचं लक्ष्य

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT