Hrithik Deepika Starrer fighter BANNED In Gulf Countries, Except UAE SAKAL
मनोरंजन

Fighter Movie: या देशांमध्ये 'फायटर'वर बंदी! रिलीजआधीच निर्मात्यांना मोठा धक्का

'फायटर' सिनेमावर काही देशांमध्ये बंदी आणली आहे

Devendra Jadhav

Fighter Movie Banned News: हृतिक रोशन-दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' या वर्षातील पहिला बिग बजेट सिनेमा रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट उद्या म्हणजेच २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

'फायटर' हा एक हवाई अ‍ॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमात हृतिक रोशनने भारतीय वायुसेने अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'फायटर'च्या निर्मात्यांना रिलीजआधीच मोठा धक्का बसलाय. काही देशांमध्ये 'फायटर'वर बंदी आणली गेलीय. वाचा सविस्तर..

या देशांमध्ये 'फायटर'वर बंदी

आखाती देशांमध्ये (Gulf Countries) 'फायटर'वर बंदी आणण्यात आलीय. बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर 'फाइटर'ला UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये रिलीज करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

10 जानेवारी 2024 रोजी सेन्सॉर स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते आणि 23 जानेवारी रोजी अधिकृतपणे सांगण्यात आले की 'फायटर' जवळपास सर्व आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही. आखाती देशांनी फायटर रिलीज करण्यास नकार देणे हा निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. या बंदीमागचं कारण अद्याप कळू शकलं नाहीय.

'फायटर'ची उत्सुकता शिगेला

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’च्या सहकार्याने ‘वायाकॉम१८ स्टुडिओ’द्वारे प्रस्तुत, ‘फायटर’ या सिनेमात सिनेरसिकांना उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हृदयस्पर्शी साहसी कथा यांचा गोफ विणणारा हा चित्रपट एक अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देतो.

२५ जानेवारी २०२४ रोजी 'फायटर' हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होत असून, हा भव्य अनुभव घेण्याकरता सज्ज राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT