Hrithik Roshan Latest News Hrithik Roshan Latest News
मनोरंजन

Hrithik Roshan : चाहत्याच्या कृत्यावर हृतिक रोशन झाला नाराज; संतापून म्हणाला...

हृतिक युवकाकडे रागाने पाहतो आणि गाडीत बसण्याआधी ओरडतो

सकाळ डिजिटल टीम

Hrithik Roshan Latest News हृतिक रोशन तसा चाहत्यांशी चांगला वागतो. मात्र, अलीकडे चाहत्याच्या कृतीमुळे तो चांगलाच संतापला. एवढेच नाही तर हृतिकने चाहत्याचा क्लासही घेतला. हृतिक दोन्ही मुलांसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर हृतिक कारच्या दिशेने जात होता. तेवढ्यात युवक येतो आणि जबरदस्तीने हृतिकसोबत (Hrithik Roshan) सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. तो चुकून हृतिकलाही ढकलतो. या कृत्याचा हृतिकला खूप राग येतो.

हृतिक रोशन (Hrithik Roshan) संतापल्याचा पाहून त्याची टीम युवकाला तिथून काढते. हृतिक युवकाकडे रागाने पाहतो आणि गाडीत बसण्याआधी त्याला ‘काय करत आहे?’ असे म्हणत ओरडतो. हृतिकच्या या वर्तनावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणी म्हणतं की सेलिब्रीटींमध्ये एवढा अहंकार का असतो? तर कोणीतरी कमेंट केले की, फक्त चाहतेच तुमच्याकडे सेल्फी काढण्यासाठी येतील. त्यांचा थोडा आदर करा.

त्याचवेळी काहींनी हृतिकचे समर्थन करीत सेलिब्रीटींनाही प्रायव्हसीची गरज असल्याचे लिहिले. तो नेहमी चांगल्या मूडमध्ये राहील असे नाही. दुसऱ्याने लिहिले की, चाहत्याची कृतीच योग्य नव्हती. हृतिकच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच विक्रम वेध या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सैफच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे साकारत आहे. याशिवाय रोहित सराफ, योगिता बिहानी आणि शरीब हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. विक्रम वेधाशिवाय हृतिक सिद्धार्थ आनंदच्या फायटर चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT