Hrithik Roshan birthday his diet plan fitness funda  sakal
मनोरंजन

Hrithik Roshan Birthday: फिटनेस फ्रिक हृतिक रोशनचा संपूर्ण डाएट खास तुमच्यासाठी, हा आहे सीक्रेट फंडा..

अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस.. त्या निमित्ताने जाणून घ्या त्याचा खास डाएट..

सकाळ डिजिटल टीम

 Hrithik Roshan: अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस. आज तो 51 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज वयाची पन्नाशी गाठून सुद्धा हृतिक एखाद्या 20 वर्षांच्या तरुण मुलासारखा दिसतो. याच कारण आहे, त्याची उत्तम फिटनेस. त्याची तब्येत, बॉडी, अॅब्ज याने तो कायमच प्रेक्षकांना भुरळ घातला आहे. पण त्याच्या या फिटनेसचा नेमका फंडा काय आहे? त्याचा डाएट काय आहे? याविषयी आम्ही आज सांगणार आहोत..

(Hrithik Roshan birthday his diet plan fitness funda )

हृतिकची 8 अॅप्स शो करणारी बॉडी लाखो तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत अनेक तरुणांसाठी तो इंस्पिरेशन आहे. तो काय खात असले, कोणता व्यायाम करत असेल याबाबत कायमच सर्वांना उत्सुकता असते. पण हृतिक फिटनेस टिकवण्यासाठी अत्यंत सध्या डाएट फॉलो करतो.

हृतिक हा बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे समतोल आहार होय. हृतिक सकाळी नाश्त्याला ताजी फळे, दोन ब्रेड आणि एग व्हाइट्स, प्रोटिन शेक, कॉर्न फ्लेक्स किंवा मोड आलेली कडधान्ये आणि दूध घेतो. दुपारच्या जेवणात पालेभाजी, रोटी आणि दाल आणि सॅलड असा त्याचा आहार असतो. रात्रीच्या जेवणात मीट किंवा फिश, ताजी फळे आणि अंडी असा त्याचा आहार असतो.

हृतिक शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पितो. दूध, दही, बदाम यांसारखे प्रोटिन-रिच पदार्थ खातो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृतिक आले आणि हळद घातलेले गरम पाणी; तसेच घरगुती काढासुद्धा पितो. घरातील खाद्यपदार्थ ओमेगा ऑइल घालून ते केले असतील याची खबरदारी हृतिक घेतो. याव्यतिरिक्त ब्रोकोली, उकडलेल्या भाज्या, ब्राऊन राइस यांचादेखील त्याच्या आहारात समावेश असतो. एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा दर तीन तासांनी विशिष्ट प्रमाण असलेला आहार घेण्यावर हृतिकचा भर आहे.

याशिवाय त्याचा व्यायामावर पूर्ण भर असतो. त्याचा बराचसा वेळ तो जीम मध्ये घालवतो. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही खास ट्रेनर जीम मध्ये असतात.अॅब्ज ही त्याची खासियत असल्याने ते टिकवण्यासाठी तो पुरेपूर व्यायाम आणि सम्यक आहार घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT