hritik deepika 
मनोरंजन

दीपिका-हृतिकची जोडी पडद्यावर झळकणार, आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- हृतिक रोशन, दीपिका पदूकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अखेर सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेता हृतिक रोशनने नुकताच १० जानेवारी रोजी त्याच्या ४७ वा बर्थ डे सेलिब्रेट केला. हृतिकने वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याने सोशल मिडियावरुन त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करत त्याचं मोशन पोस्टर देखील शेअर केलं आहे.  

अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोण 'धूम ४' किंवा इतर कोणत्याही सिनेमात एकत्र दिसून येणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस होत होती. आता हृतिकने त्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्याचा आगामी सिनेमा 'फायटर'ची घोषणा केली आहे. सोबतंच सिद्धार्थ आनंद प्रोडक्शन हाऊस marflix आणि दीपिका पदूकोण यांना सादर करत एक छोटीशी नोट लिहिली आहे.

हृतिकने 'फायटर' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलंय, ''marflix विजनच्या फायटरची झलक सादर करत आहे. दीपिका पदूकोणसोबत हा माझा पहिला सिनेमा असेल. मी या सुंदर प्रवासासाठी पूर्णपणे तयार आहे सिद्धार्थ आनंद.'' तुम्हाला या मोशन पोस्टरमध्ये हृतिकचा आवाज ऐकायला मिळेल. तो सांगतो की 'दुनिया में मिल जाए आशिक कई, पर वतन से हसीन सनम नहीं होता. हिरों मे सिमट कर, सोने से लिपट कर मरते है कई, पर तिरंगेसे खुबसुरत कफन नहीं होता.'

सिद्धार्थ आनंदने त्याच्या या स्टायलिश ऍक्शन सिनेमामध्ये बॉलीवूडचे हुशार आणि टॉप लिस्टेड सेलिब्रिटीला कास्ट केलं आहे ते म्हणजे हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोण. दीापिका सध्या अनेक सिनेमे साईन करत आहे आणि आता पुन्हा एकदा एक मोठा सिनेमा तिच्या यादीच सामिल झाला आहे. दीपिकाने 'फायटर'चं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे 'स्वप्न खरंच सत्यात उतरतात.'

तेव्हा आता या सिनेमामध्ये हृतिक आणि दीपिकाची भूमिका काय असेल? सिनेमाची कथा देशभक्तीवर आधारित असल्याचं मोशन पोस्टर मधून वाटत असल्याने नक्कीच ही जोडी कमाल करेल अशी चर्चा सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.   

hrithik roshan deepika padukone come together for siddharth anands fighter see motion poster  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT