hrithik roshan fighter historic box office collection worldwide
hrithik roshan fighter historic box office collection worldwide  SAKAL
मनोरंजन

Fighter: हृतिकचा 'फायटर' जगात भारी! हॉलिवूडला धोबीपछाड करत ठरला अव्वल, कमाईचा आकडा पाहा

Devendra Jadhav

Fighter Movie News: हृतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. हृतिकच्या 'फायटर'ने पहिल्या वीकेंडमध्ये भारतात 120 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी संथ सुरुवातीनंतर गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'फाइटर'ने शुक्रवारपासून जोरदार कलेक्शन करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही फायटर अव्वल ठरला आहे.

(hrithik roshan fighter historic box office collection worldwide)

जगभरात 'फाइटर'चा दबदबा

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या 'फायटर' चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले. हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर गेल्या वीकेंडचा सर्वात मोठा चित्रपट होता.

Comscore च्या डेटानुसार 'Fighter' ने गेल्या वीकेंडला रविवारी आंतरराष्ट्रीय बाजारातून 25 दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय केला. म्हणजेच फायटरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 208 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने कमाईचा हा विलक्षण आकडा पार केला आहे.

'फायटर'ने हॉलिवूड चित्रपटांना केले धोबीपछाड

'फायटर'ने गेल्या वीकेंडला अनेक लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांच्या आवडत्या रोमँटिक-कॉमेडी 'एनीवन बट यू' ($19 दशलक्ष) आणि ॲक्शन स्टार जेसन स्टॅथमच्या 'द बीकीपर' ($18 दशलक्ष) या सिनेमांपेक्षा वीकेंडमध्ये 'फायटर'ने सर्वाधिक कलेक्शन केले.

बालाकोट एअरस्ट्राईकवर आधारित 'फायटर' प्रेक्षकांना खूप भावत आहे. चित्रपटाची एरियल ॲक्शन आणि त्याची भावनिक कथा प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. हृतिक आणि दीपिकासोबतच या चित्रपटात अनिल कपूर, संजीदा शेख आणि करण सिंग ग्रोव्हरसारखे कलाकारही आहेत.

आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाची खरी कसोटी लागणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या वर्कींग डेजमध्ये 'फायटर'ची कमाई कशी होते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT