Hrithik Roshan And Saba Azad Photos  Esakal
मनोरंजन

Hrithik Roshan And Saba Azad Photos : गर्लफ्रेंड कमी अन् तुझी मुलगी जास्त वाटतेय! हृतिकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सबा आझादने हृतिक रोशनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले होते.

Vaishali Patil

Hrithik Roshan And Saba Azad Photos: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटांमुळे कमी अन् वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाइटमध्ये राहतो.

हृतिक रोशन गेल्या अनेक दिवसांपासून गायक आणि अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत आहे. दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सबा देखील हृतिकचे फोटो शेयर करत असते.

हृतिक रोशन आणि सबा हे दोघे सध्या अर्जेंटिनामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. अनेकदा हृतिक रोशन आणि सबा त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याचप्रमाणे यावेळीही सबाने तिच्या सोशल मीडियावर या सुट्टीच्या दिवसांची काही झलक दाखवली आहे.

सबा आझादने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. यात फोटोमध्ये हृतिक रोशन एका कॅफेमध्ये बसलेला दिसतोय तर दुसऱ्या फोटोत हृतिक आणि सबा यांनी सेल्फी काढली आहे. सबाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "माय हिप्पो हार्ट."

सध्या हे फोटो सोशल मिडियावर खुप ट्रोल झाली आहे. अनेकांनी या कपलेचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्यांना वयावरुन ट्रोल केले आहे. या फोटोत हृतिक रोशन म्हातारा दिसत असल्याच्या कमेंटही काहींनी केल्या आहेत. एकानं लिहिलयं की, बार्बी तिच्या अजोबांसोबत... तर काहींनी त्यांना बापलेकीची जोडी म्हटलं आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या वर्षी एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले. सबा हृतिक रोशनच्या कुटुंबासोबतही अनेकदा दिसली आहे.

हृतिक रोशनने 2014 मध्ये सुझान खानशी घटस्फोट घेतला. दोघांना रिहान आणि रिधान अशी दोन मुले आहेत. हृतिक रोशनचं वर्कफ्रंट, तो सध्या दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर वॉर 2 मध्येही तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिकचा गेम ओव्हर! या 10 मुद्द्यांवर कोर्टाने ठेवलं बोट; याचिका फेटाळताना स्पष्ट शब्दात म्हटलं...

Rashid Engineer Parliament Speech: ‘’कदाचित मी आजनंतर संसदेत येऊ शकणार नाही, दररोज दीड लाख कुठून आणू?’’

Russia Tsunami Video : रशियात भूकंप अन् त्सुनामीने हाहाकार; अंगावर काटा आणणारे व्हिडिओ फुटेज व्हायरल..22 देश अलर्ट मोडवर

Viral: कॉन्सर्ट सुरू असताना गायिकेवर लैंगिक अत्याचार, पुढचा शो अर्ध नग्न अवस्थेत गायली अन्...; व्हिडिओ व्हायरल

Agriculture News : पावसाने बळीराजा संकटात: नाशिकमध्ये कोथिंबीर, डांगर रस्त्यावर फेकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT