hrirtik mika 
मनोरंजन

हृतिक रोशनने न्यु इयर पार्टीमध्ये 'एक पल का जीना'वर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- नवीन वर्षात लोक जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. २०२० मधील कडू आठवणींना विसरुन २०२१ हे वर्ष नवीन आनंद घेऊन येईल अशी आशा व्यक्त करत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करत आहेत. अभिनेता हृतिक रोशन नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या धूम धाममध्ये केलं आहे. या खास दिवशी त्याने त्याच्या पहिल्या सिनेमातील गाण्यावर केवळ जबरदस्त डान्सच केला नाही तर प्रसिद्ध गायक मिका सिंहसोबत गाणं देखील गायलं. सोशल मिडियावर हृतिक रोशन आणि मिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.   

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन 'कहो ना प्यार है' सिनेमातील हिट गाणं 'एक पल का जीना' हे गाणं गात मिकाच्या सुरात सुर मिसळत आहे सोबतंच या गाण्यावर हुक स्टेप देखील करत आहे जे लोकांना खूप आवडत आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंहने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलंय, ''हॅप्पी न्यु इयर. हृतिक रोशन, जायद खान, करण बावा आणि राकेश रोशनसोबत खुपंच शानदार पार्टी केली. धन्यवाद कुकु बावा साहेब आणि राकेश रोशन अशा प्रकारे पार्टी दिल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि खुप सारा आनंद लाभो. गुडबाय २०२०, वेलकम २०२१.''

गायक मिका सिंहने काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमुळे कामवर परिणाम झाल्याचं म्हटलं होतं. त्याने म्हटलं होतं की लॉकडाऊनच्या या गेल्या ८ महिन्यात त्याच्याकडे काहीही काम नव्हतं. नुकतंच त्याने 'सयोनी' या सिनेमासाठी एक पप्पी गीत गायलं आहे.  हृतिक रोशनच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या क्रिशच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. गेल्या वर्षी हृतिक 'वॉर' आणि 'सुपर ३०' सिनेमात दिसून आला होता.  

hrithik roshan sing and dances in ek pal ka jeena song with mika singh at new year bash video viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Ganesh Kale Case: Vanraj Andekarचा बदला Ayush Komkar नंतर गणेशला संपवला, टोळीयुद्ध पेटलं.. | Sakal News

Solapur Politics: 'भाजप माेहिते-पाटील यांना बालेकिल्ल्यातच घेरणार'; कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांचा पत्नीसह शुक्रवारी पक्षप्रवेश..

SCROLL FOR NEXT