hrithik roshan starrer fighter movie box office collection republic day 2024
hrithik roshan starrer fighter movie box office collection republic day 2024  SAKAL
मनोरंजन

Fighter Box Office: दोन दिवसात 'फायटर' ५० कोटी पार, हृतिक-दीपिकाचा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी

Devendra Jadhav

Fighter Box Office News: 'फायटर' सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज झालाय. 'फायटर'ची गेली अनेक महिने उत्सुकता होती. या सिनेमाच्या माध्यमातून हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. सिनेमाला लोकांचं चांगलं प्रेम मिळतंय. दमदार कथानक आणि हवाई अॅक्शन सीन्सच्या जोरावर 'फायटर'ने भरघोस कमाई केलीय.

'फायटर' ५० कोटी पार

'फायटर'ने पहिल्या दिवशी 24 कोटी रुपयांची साधारण कमाई केली. बिग बजेट हृतिक रोशन-स्टारर 'फायटर'ने दुसऱ्या दिवशी मात्र भरघोस कमाई केली.

फायटरने दुसऱ्या दिवशी 70% पेक्षा जास्त उडी मारल्याचा अंदाज आहे, रिलीझच्या दुसऱ्या दिवशी फायटरने 39 कोटी रुपये कमावले. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा 'फायटर'ला चांगलाच फायदा झाला. यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची देशांतर्गत एकूण कमाई 61 कोटी रुपये झाली आहे. या विकेंडला 120 कोटी ते 150 कोटी रुपये 'फायटर' कमवेल असा अंदाज आहे

या देशांमध्ये 'फायटर'वर बंदी

आखाती देशांमध्ये (Gulf Countries) 'फायटर'वर बंदी आणण्यात आलीय. बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर 'फाइटर'ला UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये रिलीज करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

10 जानेवारी 2024 रोजी सेन्सॉर स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते आणि 23 जानेवारी रोजी अधिकृतपणे सांगण्यात आले की 'फायटर' जवळपास सर्व आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही. आखाती देशांनी फायटर रिलीज करण्यास नकार देणे हा निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. या बंदीमागचं कारण अद्याप कळू शकलं नाहीय.

'फायटर'ची उत्सुकता शिगेला

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि ‘मार्फ्लिक्स पिक्चर्स’च्या सहकार्याने ‘वायाकॉम१८ स्टुडिओ’द्वारे प्रस्तुत, ‘फायटर’ या सिनेमात सिनेरसिकांना उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हृदयस्पर्शी साहसी कथा यांचा गोफ विणणारा हा चित्रपट एक अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देतो.

२५ जानेवारी २०२४ रोजी 'फायटर' हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल झाला असून, हा भव्य अनुभव घेण्याकरता लोक हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT